LaturNews

अमृत योजना वेळेत अशक्य, सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी

2017-08-11 7:50:11 197 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर शहराची पाण्याची वाढीव गरज पूर्ण करण्यासाठी आणि पाणी वितरण यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी अमृत योजना कामी यावी अशी अपेक्षा आहे. मात्र या योजनेतील कामे अतिशय संस्थगतीने सुरु आहेत. १० महिन्यांच्या कालावधीत केवळ २० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उरलेल्या आठ महिन्यात ऐंशी टक्के कामे कशी पूर्ण होतील हा प्रश्न आहे. यासंदर्भात जीवन प्राधिकरण कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या योजनेतील कामांची पूर्तता मुदतीत व्हावी या अनुषंगाने या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी विक्रांत गोजमगुंडे, बाळासाहेब देशमुख, राजा मनियार, अहमदखां पठाण यांनी केली आहे. या योजनेत जलकुंभ उभारणी, काही ठिकाणी नवी पाईपलाईन, काही जुन्या दुरुस्त्या, नवे वॉल्व टाकणे अशी कामे या योजनेतून व्हायची आहेत. वारंवार सूचना देऊनही गुत्तेदार कुणालाच दाद द्यायला तयार नाही. त्याच्यावर कारवाई करण्याची केवळ बोलले जाते, होत काहीच नाही. याबाबत पुन्हा येत्या शनिवारी जीवन प्राधिकरण येथे बैठक बोलावण्यात आली आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी