LaturNews

नायडू तेरावे उप राष्ट्रपती, मंत्री जावडेकरांना स्वाईन फ्लू, सीए तपासणार पेपर, बॅंका चार दिवस बंद, मुंबईत रविवारी शाळा, योगी पंतप्रधान?......११ ऑगस्ट

11-08-2017 : 02:24:19 1446 Views 0 Comments

* लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लातूर बाजार समितीने घेतले आरोग्य शिबीर
* १३ वे उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घेतला पदभार, राजघाटावर वाहिली श्रद्धांजली
* व्यंकय्या नायडू भारतात जन्मलेले पहिले उप राष्ट्रपती- पंतप्रधान
* मुंबईतील शाळांमध्ये आठवड्यातून दोनदा ‘वंदे मातरम’ अनिवार्य
* २०१९ नंतर खासदार व्हायचं असेल तर चांगली कामे करा- पंतप्रधान
* गर्भपातासाठी चारकोपच्या १२ वर्षीय मुलीची सुप्रीम कोर्टात धाव
* मुंबई विद्यापीठ कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी सीएंची मदत घेणार
* शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या लोगोत टिळकांचा समावेश नाही
* इंदूरमध्ये ब्लू व्हेल गेममुळे इमारतीवरुन उडी मारणार्‍या विद्यार्थ्याला त्याच्या मित्रांनी वाचवलं
* लातुरात ‘कायदे पाळा’ दिन, धरणे आंदोलन करणार
* २८ ऑगस्ट रोजी लातुरात प्रकाश आंबेड्कर यांच्या उपस्थितीत बहुजन हक्क परिषद
* उदगीरच्या हत्तीबेटाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देऊ- जिल्हाधिकारी श्रीकांत
* लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज लातूर बाजार समितीच्या वतीने आरोग्य शिबीर
* डोकलाम संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नथांग गाव रिकामे करण्याचे गावक‍ऱ्यांना आदेश, वृत्ताचा भारतीय लष्कराकडून इन्कार
* भारत आणि चीनसोबत आमचे चांगले संबंध, दोन्ही देशांनी चर्चेतून तोडगा काढावा यासाठी प्रयत्न करणार- अमेरिका
* उद्यापासून बँका चार दिवस बंद, जन्माष्टमी आणि स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने बँका उघडणार बुधवारी
* बिहारचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांची उत्तर प्रदेशात गाझियाबाद स्थानकात आत्महत्या
* राज्याने कार्यक्षम आणि संवेदनशील अधिकारी गमावला- मुख्यमंत्री नितीश कुमार
* सोलापुरात सिद्धेश्वर साखर कारखाना चिमणी हटावसाठी आज शेतकर्‍यांचा मोर्चा
* सोलापूर विद्यापीठात आज लघुपट कार्यशाळा
* कृषीसेवक भरती परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मॅटने केला रद्द, निवड झालेल्या ७३० कृषीसेवकांना रूजू करून घेण्याचे आदेश
* पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यात खरिपाची परिस्थिती चिंताजनक
* मराठवाडा, अमरावती आणि नागपूरमधील धरणे कोरडीच, पुणे, कोकण आणि नाशिक विभागात समाधानकारक स्थिती
* मराठा मोर्चासाठी दिलेली सुट्टी भरून काढण्यासाठी रविवारी मुंबई शहरातील शाळा राहणार सुरू
* मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ‘म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चरने बेकायदा लूट केल्याच्या तक्रारीची शहानिशा सुरू- राज्य सरकार उच्च न्यायालयात
* राज्यातील आरोग्य विभागात डॉक्टरांची १५ हजार १९५ पदे रिक्त
* मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘बदल्यांचा बाजार’ नियुक्ती रोखण्यासाठी सात कोटी घेतल्या प्रकरणी चौकशी करा- पृथ्वीराज चव्हाण
* मुंबईत व्यावसायिक विभागातीलच हॉटेल्स, पब, क्लब, रेस्टॉरंट २४ तास सुरू राहतील- मुख्यमंत्री विधानसभेत
* मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मंत्रालयात ‌विशेष कक्ष स्थापन होणार
* कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी प्रकल्पगस्तांना कुंभी प्रकल्पातील ३०.८२ हेक्टर जमीन देण्यास सरकारची मान्यता- चंदकांत पाटील विधानसभेत
* जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी चळवळ निर्माण होणे आवश्यक, अन्यथा महाराष्ट्राचे वाळवंट होईल- जलतज्ञ राजेंद्रसिंह
* ‘नमामि चंद्रभागा’ या उपक्रमाअंतर्गत भीमा नदी खोरे जलसाक्षरता यात्रेचा भीमाशंकर येथे राजेंद्रसिंह यांनी केला प्रारंभ
* बचत गटाचे ०२ हप्ते थकले म्हणून औरंगाबादच्या अपहरण झालेली महिला सापडली वैजापुरात, ०६ महिलांवर गुन्हा दाखल
* नागपूर येथील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये होणार स्पाइस जेटच्या बोईंग विमानांची दुरुस्ती
* नाशिकमध्ये फुगा गिळल्याने ०८ महिन्याच्या बाळाचा मृत्यू
* परदेशी विद्यार्थीनीचा विनयभंग करणार्‍या पुण्यातील भारती विद्यापीठाचा प्राध्यापक गजाआड
* विद्यार्थिनींची सातत्याने छेड काढणार्‍या औरंगाबादच्या पोद्दार हायस्कूलच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
* शिष्यवृत्तीत गेल्या तीन वर्षांत तब्बल ५०५ कोटीची कपात केल्याचा आरोप करत ओबीसी संघर्ष समन्वय समितीने काढला मोर्चा
* गुजरात विधानसभेच्या १८३ पैकी १५० जागा जिंकण्याचे भाजपाचे उद्दिष्ट, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे अमित शहा यांचे आवाहन
* उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २०२४ मध्ये पंतप्रधान होतील- आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंह
* पनामा पेपर्स प्रकरणात संपूर्ण चौकशीनंतरच कारवाई केली जाईल, पाकसारखी कारवाई भारतात होणार नाही- अरुण जेटली
* केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना स्वाइन फ्लूची लागण
* अहमद पटेल यांच्या निवडीला भाजप कोर्टात आव्हान देण्याची शक्यता
* अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरूच राहणार, लिलावावर स्थगितीची मागणी करणारी सहाराची याचिका फेटाळली सुप्रीम कोर्टाने
* २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राजदच्या रॅलीत सहभागी होणार- समाजवादीचे अखिलेश यादव
* लंडन येथे वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत भालाफेकीत अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा दविंदरसिंग कांग ठरला पहिला भारतीय
* चीनमधील शॅनिक्स प्रांतामध्ये झालेल्या स्फोटात ३६ जण ठार तर १३ जण जखमी
* रशियन विमानाने अमेरिकेच्या राजधानीवरुन घातल्या घिरट्या

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी