LaturNews

लातूर बाजार समितीचं पुढचं पाऊल, आता इ ऑक्शन

2017-08-12 12:07:14 1454 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): महराष्ट्रातील नामांकित बाजार समित्यात आघाडीवर असलेल्या लातुरच्या बाजार समितीने एक पाऊल पुढे टाकत आता इ ऑक्शन सुरु केले आहे. सुरुवातीला करडी, सूर्यफूल आणि भुईमूग या तीन शेती उत्पादनांची इ ऑक्शनसाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी करडीचे ऑक्शन करण्यात आले. राज्यातील ३० बाजार समित्यांत इ ऑक्शन केले जाणार आहे. त्यात लातूर बाजार समितीची निवड करण्यात आली आहे. यासाठी लागणारी यंत्रणा, उपकरणे महाराष्ट्र शासनाने पणन विभागामार्फत उपलब्ध करुन दिली आहेत. बाजार समितीने त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. इ ऑक्शनसाठी १६ हजार शेतकरी. १२०० आडते, ४५० व्यापार्‍यांची नोंद करुन घेतली. हे लोक इ ऑक्शन मध्ये बोली लावू शकतात, दुकानात बसून व्यापारी आपला भाव सांगू शकतो. यामुळे शेतीमालाला अधिकाधिक भाव मिळू शकतो, प्रारंभी निवडक शेतीमालाचे ऑक्शन केले जाईल. पायंडा पडला की सगळ्याच शेतीमालाचे इ ऑक्शन केले जाईल असे सभापती ललीतभाई शहा यांनी सांगितले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी