LaturNews

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचार्‍यांचा माहितीकोष

2017-08-12 12:28:19 1580 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष दरवर्षी अद्यावत करण्यात येणार आहे. या माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील व नियमित्तेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरील, रोजंदरीवरील, अंशकालीन, मानसेवी इत्यादी.) तसेच तदर्थ तत्वावर नेमणूका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती ०१ जुलै २०१७ या संदर्भ तारखेस अनुसरुन जमवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने याविषयी २० जुलै २०१७ रोजी शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. राज्यस्तरावर अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई, विभागीय स्तरावर संबधित अर्थ व सांख्यिाकी संचालनालय प्रादेशिक कार्यालय व जिल्हा स्तरावर संबधित जिल्हा सांख्यिकी कार्यालय शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही करणार आहेत. शासकिय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करते वेळी माहिती नोंदणी करिता महाराष्ट्र शासनाच्या www.mahasdb.maharashtra.gov.in या वेबसाईटवर EMDb या नावाने ऑनलाईन संगणकीय आज्ञावली उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
जिल्हा सांख्यिकी कार्यालय, लातूर यांच्याकडून जिल्हातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी Login / User ID व Passward तात्काळ प्राप्त करुन ऑनलाईन संगणकीय आज्ञावलीमध्ये माहिती नोंदणी ०१ सप्टेंबर ते ३० नोंव्हेबर २०१७ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, लातूर यांच्याकडून दिले जाणारे माहिती भरल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र माहे नोंव्हेबर-१७ च्या वेतन देयकासोबत व माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी २०१८ च्या वेतन देयका सोबत जोडणे शासन निर्देशनानुसार बंधनकारक आहे. अन्यथा प्रमाणपत्रा शिवाय सदर महिन्याची वेतन देयके कोषागार कार्यालयात कोणत्याही परिस्थितीत स्विकारली जाणार नाहीत असे कळवण्यात आले आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी