LaturNews

उदगीरच्या विकास कारखान्यात रोलरचे पूजन, हंगामाची तयारी

2017-08-12 12:42:13 1517 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): तोडार ता. उदगीर येथील विकास सहकारी साखर कारखाना युनीट ०२ येथे येत्या गळीत हंगामासाठी तांत्रिक कामे पुर्णत्वास आली असून जळकोट काँग्रेस कमिटी अध्यक्ष मन्मथअप्पा किडे व कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोविंद तुकाराम बोराडे यांच्या हस्ते विधीवत रोलर पूजन करण्यात आले.
यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समिती उदगीरचे सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी सभापती जिल्हा परिषद कल्याण पाटील, जिल्हा परिषद सदस्य संतोष तिडके, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस विनोद सुडे, नगरसेवक विक्रांत भोसले, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मरल्लापल्ले, कारखान्याचे संचालक नरसिंगअप्पा बुलबुले व कार्यकारी संचालक अजित देशमुख उपस्थित होते.
लोकनेते विलासरावजी देशमुख यांची प्रेरणा, माजी मंञी दिलीपरावजी देशमुख यांचे नियोजन तसेच कारखान्याचे संस्थापक माजी राज्यमंञी आ. अमित विलासराव देशमुख, व चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्त्वाखाली विकास युनिट ०२ कारखान्याने मागील तीन गळीत हंगामात यशस्वी गाळप केले आहे. तिनही हंगामात ऊस पुरवठादार शेतकर्‍­यांना देय एफआरपी पुर्णपणे अदा करण्यात आली आहे. गळीत हंगाम १६-१७ मध्ये २५०० चा उच्चांकी दर दिला आहे.
येऊ घातलेला गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक तांत्रिक व पूरक कामे होत आली असून जास्तीत जास्त क्षमतेने ऊसाचे गाळप केले जाणार आहे. यासाठी लागणारी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेची उभारणी करण्यात आली. त्यांना अॅडव्हान्स रकमेचेही वाटप करण्यात आले आहे.
कारखान्याच्या वतीने शेतक­यांनी ऊस उत्पादनाकडे मोठ्या संख्येने वळावे यासाठी ऊस बेण्याच्या निवडीपासून ते अंतर्गत मशागत, खते व ठिंबक सिंचनाविषयी माहिती देण्यासाठी ऊस लागवडीबाबत जनजागृती केली जात आहे. शेतकरी वर्गातूनही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. कारखाना साईटवर ऊस बेणे मळा तयार करण्यात आला आहे. येणार्‍­या हंगामात शेतकर्‍­यांना ऊस बेणे वाटप केले जाणार आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी