LaturNews

पावसासाठी यज्ञ, एसीबीचा एसीबीवर छापा, शेतकर्‍यांचा चक्का जाम, नगर-परळी मार्गाला मुंडेंचं नाव, डीजे होणार मुका, रास्त भाव दुकानदारांना दुप्पट कमिशन.......१२ ऑगस्ट २०१७

12-08-2017 : 07:19:51 1763 Views 0 Comments

* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३०००, हरभरा ५८५१ तर तूर पोचली ४७४१ वर
* जुन्या टाईपरायटरवर झाली आज शेवटची परिक्षा, १८७४ साली लागला होता टाईपरायटरचा शोध
* रावसाहेब दानवे यांच्याकडे थकले ०२ लाख ६९ हजार रुपयांचे वीज बील, दानवेंना दंड भरावा लागेल- उर्जामंत्री
* मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये चालवली बैलगाडी
* उद्योगमंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिला राजीनामा पण मुख्यमंत्र्यांनी नाकारला
* उदगीरच्या विकास कारखान्यात रोलरचे पूजन, गळीत हंगामाची तयारी पूर्ण
* लातूर-औसा रोडवरील तावरजा नदीच्या शेजाच्या महादेव मंदिरात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता पर्जन्यवृष्टी महायज्ञ
* लातुरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयावर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा
* मध्यस्थामार्फत लातूर एसीबीचे उपाधिक्षक सुरेश शेटकार यांनी पन्नास हजारांची लाच मागितल्याचे उघड, मध्यस्थाला घेतले ताब्यात
* लातूर येथे पाच सरकारी कंत्राटदारांच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे, ३५ कोटींची संपत्ती उघड
* लातुरच्या बाजार समितीत सुरु झाले इ ऑक्शन
* १४ ऑगस्ट रोजी शेतकरी सुकाणू समिती करणार लातूर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन
* स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणार कमिशन दुप्पट
* स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट
* जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आज भाजपचे महासचिव राम माधव यांना भेटणार
* उत्तर प्रदेशात गोरखपूरच्या बीआरडी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्यानं ३० मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त शासनाने फ़ेटाळले, नेमली चौकशी समिती
* गोरखपूर येथील बीआरडी हॉस्पिटलमध्ये ३० मुलांच्या मृत्यूनंतर ऑक्सिजनचा पुरवठा, कॉलेजमध्ये कडक सुरक्षा
* बक्सरमधील जिल्हा दंडाधिकार्‍यांनी केली आत्महत्या, मृतदेह सापडला रेल्वे रुळाजवळ
* अयोध्येतील राम मंदिर- बाबरी मशीद जमीन मालकी प्रकरणाची पुढील सुनावणी ०५ डिसेंबरला
* भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई यांची आज जयंती
* अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला गोपीनाथ मुंडे यांचं नाव, देण्याचा बीड जिल्हा परिषदेचा ठराव
* दहीहंडीच्या दिवशी घुमणारा लाऊडस्पीकरचा दणदणाट यंदा नाही, राज्यातील प्रकाश आणि ध्वनी व्यावसायिकांचा मूक दिन पाळण्याचा निर्णय
* मुसलमानांच्या मनातील धर्मांध भावना आणि अराष्ट्रीय अंधश्रद्धेवर हमीद अन्सारींनी प्रहार करायला हवा होता- शिवसेना
‘* वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणार्‍यांपासून हिंदूंच्याही मनात असुरक्षिततेची भावना- सामना
* अन्सारी शेवटच्या दिवशी ‘जाता जाता’ हे बोलले ही वेदना नसून सत्ता सुटल्याची व्यथा- शिवसेना
* मुसलमान संकटात असल्याची भावना होती तर त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा त्याग आधीच करायला हवा होता- शिवसेना
* मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील गृह खात्याच्या दिरंगाई आणि वेळकाढूपणामुळे पोलीस दलाचे आधुनिकीकरण रखडल्याचा कॅगचा ठपका
* दिरंगाईमुळे पाच वर्षांत केंद्र सरकारकडून आधुनिकीकरणासाठी मिळणारा २६५ कोटींचा निधी मिळाला नसल्याचा कॅगचा अहवाल
* राधेश्याम मोपलवार यांची ज्‍येष्‍ठ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्‍वाखाली एसआयटी नेमून चौकशी करण्यात येईल- मुख्यमंत्री
* मुख्यमंत्र्यांनी घोटाळेबाज मंत्र्यांना क्लीनचीट देणारी फॅक्टरी उघडली आहे- धनंजय मुंडे
* राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली, गँगस्टर अबू सालेम तुरुंगात वापरत असलेला मोबाइल फोन मुंडे यांनी केला सभागृहात सादर
* मुंबईत शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याच्या निर्णयास मनसेचा विरोध, आधी शिक्षण सुधारा मग ‘वंदे मातरम्’ची सक्ती करा- राज ठाकरे
* मुंबई विद्यापीठाने फक्त पुरवणी तपासूनच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केल्याची माहिती उघड
* राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून
* नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे २०१६-१७ मध्ये ०७.५ टक्के आर्थिक विकासदर गाठणे अवघड - सरकारचा अहवाल
* शुद्ध खाद्यतेलावरील आयात कर झाला १० टक्क्यांवरुन १५ टक्के
* शाळा आणि मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं गेलं पाहिजे आणि ध्वजारोहण न करणारे देशद्रोही- विनय कटियार
* उत्तर प्रदेश मदरसा शिक्षा परिषदेचे राज्यातील सर्व मदरशांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आणि राष्ट्रगीत गायनाचे आदेश
* सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी गीतकार प्रसून जोशी यांची निवड
* विराट युद्ध नौकेच्या संग्रहालयासाठी नौदलाकडे गोवा आणि महाराष्ट्राचाही प्रस्ताव
* आशिया शॉटगन चॅम्पियनशीपमध्ये शूटर माहेश्वरी चौहानला कांस्य पदक
* सोमालियात असलेल्या अल-शबाब गटावर अमेरिकन सैन्याचा ड्रोनद्वारे हल्ला

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी