LaturNews

विलास बँकेच्या वाटचालीतून सर्वसामान्यांना दिलासा- आ. अमित देशमुख

2017-08-12 19:28:13 1651 Views 0 Comments

पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि गोव्यातही शाखा उघडणार
लातूर (आलानेप्र): विलास को-ऑपरेटिव्ह बँक विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली आहे. त्यामुळे बँकेची वाटचाल त्यांच्या विचारांना अनुसरुनच अधुनिक पध्दतीने, पारदर्शक, गतिमान कारभारासह सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष आ. अमित देशमुख यांनी केले.
विलास को-ऑपरेटिव्ह बँकेची १६ वी सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात झाली. त्या प्रसंगी आमदार अमित देशमुख बोलत होते.
यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, मनपा स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, मनपातील विरोधी पक्ष नेते अॅड.दीपक सुळ, जयसिंहराव देशमुख, अॅड.विक्रम हिप्परकर, विकास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, लातूर तालूका काँग्रेसचे अध्यक्ष दगडूसाहेब पडीले यांची प्रमुख उपस्थिती होती.
विलास को-ऑपरेटिव्ह बँकेने कमी कालावधीत जी प्रगती केली त्यामागे असंख्य चांगली कारणे आहेत. विकासरत्न विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांचे सततचे मार्गदर्शन, संचालक मंडळातील समन्वय आणि सभासदांच्या वि•श्वासावर बँकेने प्रगतीचा एक टप्पा गाठला आहे. सर्वसामान्यांचे अर्थकारण बदलणे हा विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचा मुख्य उद्देश आहे. त्यादृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. बँकेच्या शाखा मराठवाडयातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, गोवा आदी ठिकाणी उघडण्याचा मानस आहे. उच्च शिक्षणासाठी गृह कर्ज, नोकरदारांना कर्ज दिले जाणार आहे इतकेच नव्हे तर मागेल त्याला कर्ज ही शा•श्वती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ही आमदार देशमुख यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी आमदार वैजनाथराव शिंदे यांनी विलास बँकेच्या यशस्वी वाटचालीचे कौतूक करुन ही बँक सर्वसामान्यांचा आधार बनत असल्याचे नमुद केले. ललितभाई शहा म्हणाले की, विलास बँकेने सुरुवातीपासूनच गरजूंना मदत केली आहे. बँकेचा एन.पी.ए. वाढणार नाही, याची काळजी घेतली आहे. अशोक गोविंदपूरकर म्हणाले की, कमी अवधीत मोठी झालेली बँक म्हणजे विलास बँक होय. प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते यांनी केले. विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायएस मशायक यांनी केले. प्रारंभी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पाहूण्यांचे स्वागत बँकेचे संचालक एस.डी.कातळे, एबी शिंदे, एसए धानुरे, एएस कामदार, डॉ. जे कोळगे, केएन अन्सारी, एसएन पडिले, पी.के.कावळे, केएस जाधव, व्हीव्ही पुरी, सीए व्हीबी साळुंके यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन राहूल इंगळे यांनी केले तर अॅड. केएस जाधव यांनी आभार मानले. सभेस जितेंद्र स्वामी, रामचंद्र सुडे, सुपर्ण जगताप, मनोज पाटील, जयचंद भिसे, सत्तारभाई, प्रा. सुदर्शन मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी