LaturNews

विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमीत्त विलासबाग येथे प्रार्थना सभा

2017-08-12 19:34:50 2146 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमीत्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता विलासबाग, बाभळगाव येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राम बोरगावकर आणि समूह यांचा स्वराजली कार्यक्रम होईल. या सभेसाठी सकाळी ८.५० वाजता प्रार्थनास्थळी स्थानापन्न होणे अपेक्षित आहे. सकाळी ९.०० वाजता राम बोरगावकर आणि समूह यांचा स्वरांजली कार्यक्रम होईल. यानंतर पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहण्यात येईल. आदरांजली वाहील्यानंतर सकाळी ९.५५ वाजता प्रार्थना सभा संपेल. या प्रार्थना सभेचे सुत्रसंचालन रामानुज रांदड करणार आहेत. कार्यक्रमास जनतेने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
विलासराव देशमुख यांनी लोकशाहीतील नेतृत्वाचा प्रवास हा पायरी ते शिखर असा झाला. राजकारण हे क्षेत्र त्यांनी जाणीवपूर्वक निवडले व त्याच क्षेत्रातून लोकसेवेत ते कार्यरत राहिले. बाभळगावचे सरपंच, राज्याचे मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री हा प्रदीर्घ प्रवास राहिला. त्यांच्या नेतृत्वगुणाच्या जडणघडणीत ग्रामीण भाग व ग्रामीण लोकजीवनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. यामुळे ग्रामीण भाग, शेती व शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव, त्याचा सखोल अभ्यास होता. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांनी पायाभूत सुविधा उभारल्या. शेती आणि शेतकरी अडचणीत येईल तेव्हा तातडीने सहकार्य करण्याच्या भुमिका त्यांनी घेतल्या. सहकारातून ग्रामविकास हे सूत्र स्विकारून ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित केली. त्यांच्या दूरदृष्टीतून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, विकास, रेणा, संत शिरोमणी, प्रियदर्शनी व जागृती या साखर कारखान्यांच्या माध्यमातून व लातूर जिल्हयातील सहकारी संस्थाच्या माध्यमातून विकास गतीमान केला. याशिवाय सहकार चळवळीला व्यवस्थापक हे शेतकर्‍यांचे विश्वस्त, पारदर्शक व शेतकरी हिताचे निर्णय, गतीमान प्रशासन, कल्याणकारी योजना, नियोजनबद्ध कारभार, आर्थीकशिस्त आदी नवीमूल्ये दिली. येथील सहकार चळवळ राज्यातच नाही तर देशपातळीवर नावारुपाला आली आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी