LaturNews

जिल्हाधिकारी-एसपी गातात, धस भाजपात? विलासरावांचा स्मृतीदिन, आज लेफ्टी डे, शरद यादव आऊट.....१३ ऑगस्ट २०१७

2017-08-13 19:52:36 2807 Views 0 Comments

* जम्मू काश्मिरात अतिरेक्यांशी लढताना अकोल्याचा जवान सुमेध गवई शहीद
* हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये भूस्खलन, सात जणांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी, सहा बसेस अडकल्या
* सुरेश धस यांचा भाजपा प्रवेश जवळपास नक्की, स्नेहभोजनाला पंकजा मुंडे यांची उपस्थिती
* मला अडचणीत आणण्यासाठी घाणेरडं राजकारण, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री- पंकजा मुंडे
* सर्पदंशाने ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू, राज्यातील आश्रमशाळांची तपासणी होणार
* रेल्वे भरतीच्या नियमात बदल केल्यानं दिल्लीत रेल्वे प्रशिक्षणार्थींचं आंदोलन, मुंडनही केले
* मुंबईत गणेश मुर्तींचं आगमन
* लातुरात मोहम्मद रफींच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात एसपी राठोड, जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी गायले गाणे
* लाचलुचपतचे डीवायएसपी सुरेश शेटकर सापडेनात, एसीबी आणि शिवाजीनगर पोलिसांकडून शोध जारी
* लातुरच्या चौकाचौकात वाहतूक सिग्नल बसवण्याच्या कामाची मुदत संपली, अनेक कामे अपूर्ण
* शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर उद्या १४ तारखेला लातूर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन
* लातुरच्या विद्यापीठ उपकेंद्राला विद्यापिठाचा दर्जा द्या, शिवाजी पाटील कव्हेकर यांची राज्यपालांकडे मागणी
* लातुरच्या जिल्हाधिकार्‍यांनी घेतले सहकुटुंब ग्रामदैवत सिद्धेश्वराचे दर्शन
* उद्या १४ तारखेला लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १५१ दवाखान्यात आरोग्य शिबीर
* नितीश कुमार यांनी शरद यादव यांना हटवले गट नेतेपदावरून
* 'रालोआ'मध्ये सहभागी होण्यासाठी अमित शहा यांनी नितीश कुमार यांना दिलं आमंत्रण
* नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर तात्काळ ट्वीट करणारे पंतप्रधान गोरखपूर दुर्घटनेत ३० मुलांचा जीव गेल्यानंतरही गप्प का?- आपचा प्रश्न
* ०७ ऑगस्टला- ०९, ०८ ऑगस्टला- १२, ०९ ऑगस्टला- ०९ आणि १० ऑगस्टला २३ मृत्यू - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
* आज साजरा होतोय आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन, गोव्यात जगभरातील डावखु-या प्रतिभावंतांच्या संग्रहालयाचे होणार उद्घाटन
* निसर्ग कवी बालकवी आणि नाटककार, पत्रकार आचार्य अत्रे यांची आज जयंती, अहिल्याबाई होळकर, फ़्लॉरेंन्स नाईंटींगेल यांचा स्मृतीदिन
* साउंड आणि लाईट व्यावसायिकांचा संप मागे
* स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिले ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचे संकेत
* मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठय़ावर, मूग, उडीद हातातून गेले, सोयाबीन, मका, तूर उत्पादन ६० टक्के घटण्याचा अंदाज
* दिलेल्या मुदतीत पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात अपयशी ठरल्याने मुंबई विद्यापीठ कुलगुरू संजय देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस
* पुणे येथे खंडपीठ स्थापन करण्याबाबत देवेंद्र फडणवीस सकारात्मक, प्रस्ताव मान्य झाल्यास राज्याकडून मिळणार २२ कोटींचा निधी
* ठाण्यातील महापौर मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्रीय धावपटूंसह २० हजार स्पर्धकांचा समावेश
* शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाचे १९ ऑगस्ट रोजी प्रकाशन, उद्धव ठाकरे, शरद पवार निमंत्रित
* सुभाष देसाई यांच्या पाठीशी शिवसेना उभी, चौकशीविना शिक्षा होण अयोग्य- उद्धव ठाकरे
* मुंबई, औरंगाबाद, नागपूरला फॅमिली कोर्टसाठी स्वतंत्र इमारत होणार- न्यायमूर्ती रेवती डेरे
* प्रकाश मेहतांना चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रीपदावर राहण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले
* उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा न स्विकारुन सरकारने नैतिकता धाब्यावर बसवली- कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत
* गणेश मंडळे आणि कार्यकर्ते नियम पाळतील, तुम्हीही प्रेमाने वागा- देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यात पोलीस आयुक्तांना सल्ला
* मुंबई विद्यापीठातील नामांकित महाविद्यालयांतील हुशार विद्यार्थ्यांना १५ ते २० गुण मिळाल्याचे उघडकीस
* राज्याच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या कमतरतेमुळे तीन वर्षांत नसबंदीच्या आकडेवारीत घट होत असल्याचे वृत्त
* लोकमंगलने परस्पर कर्ज उचलून फ़सवणूक केलेल्या इंदापूरच्या ऊसतोड मजुरास तक्रार न देण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस
* नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात जैन मंदिरातील अडीचशे वर्षांपूर्वीच्या तीर्थंकर पार्श्वनाथ मूर्तीची चोरी
* ठाणे येथे मालगाडीवर चढून सेल्फी काढताना तरुणाचा मृत्यू
* गोरखपूर दुर्घटनेची जबाबदारी घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा- काँग्रेसचे मनीष तिवारी
* जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे सुरु केले 'भारत जोडो' अभियान
* गोरखपूरमधील ६३ मुलांचा मृत्यू हत्याकांड, दोषींविरोधात कडक कारवाई करा- साक्षी महाराज
* जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथे चकमकीत दोन जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा
* बांदीपुराच्या हजीनमधील हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी
* छत्तीसगडमधील सुकमामध्ये चकमकीत ०२ नक्षलवादी ठार

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी