LaturNews

गंगापुरात सर्वाधिक ‘नोटा’ ३२ तर मुरुडमध्ये एकही नाही, प्रमाण ०.६४ टक्के

2017-10-09 21:41:19 1484 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत वरील पैकी कुणीच नाही अर्थात ‘नोटांचा भरपूर वापर झाला. सर्वाधिक वापर गंगापुरात ३२ इतका झाला. मतदारांनी एकूण ४५८ मते नोटात नोंदवली. मुरुडमध्ये एकानेही नोटाचा अधिकार वापरला नाही. गावे आणि नोटांची संख्या याप्रमाणे;
आखरवाई ०४, अंकोली ०७, भातखेडा ०२, भोसा ०९, बिंदगीहाळ ०८, बोडका वाकडी ०७, भोसमुद्रगा १२, बोपला १०, चांडेश्वर ०४, चिकलठाणा ०२, चिंचोली ब. २७, ढाकणी ०७, गांजूर ताडकी ०६, गंगापूर ३२, हरंगुळ १८, कारसा ०६, कासारगाव ०६, कासारखेडा ११, खाडगाव २९, खंडापूर १८, कोळपा ०६, महापूर २७, ममदापूर ०९, मळवटी ०८, मांजरी ०७, मुरुड ००, नांदगाव ०७, पाखरसांगवी २१, पेठ १८, पिंपळगाव ०४, पिंपरी अंबा १५, रायवाडी ०६, रामेश्वर ०८, रुई दिडेगाव १२, सलगरा ०६, सामनगाव ०४, सावरगाव ०७, शिऊर १८, सोनवती १३, टाकळी ०८, वरवंटी ०७, वासनगाव १२, येळी १०.
लातूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात ७६ टक्के मतदन झाले. एकूण ९४ हजार ३१२ मतदारांपैकी ७१ हजार ६७९ जणांनी मतदान केले. त्यापैकी ४५८ जणांनी नोटाचा अधिकार वापरला. हे प्रमाण ००.६४ टक्के एवढे होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी