LaturNews

वाढते लोडशेडींग: महावितरणसमोर आर्यन सेनेची निदर्शने

10-10-2017 : 09:41:19 653 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): ऐन दिवाळीच्या काळात लोडशेडींग सुरु झाल्याने सबंध महाराष्ट्र त्रस्त झाला आहे. मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा केला जात नाही. दिवसाही भारनियमन केले जाते याचा निषेध करीत महाराष्ट्र आर्यन सेनेने महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली. अधिकार्‍यांना निवेदनही दिले.
दिवसाही भाअनियमन चालू असल्याने व्यापारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. व्यापारावर, उद्योगावर परिणाम होत आहे. दिवाळीच्या काळात लोडशेडींग केली जाणार नाही असे उर्जामंत्री सांगतात पण कमालीचे भारनियमन होत आहे. यामुळे सबंध महाराष्ट्र त्रस्त झाला आहे असे आर्यन सेनेचे संस्थापक अध्यक्ष अविराजे निंबाळकर, संतुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप गंगणे यांनी सांगितले. यावेळी बसव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बालाजी अप्पा पिंपळे, अजय कलशेट्टी, योगेश सूर्यवंशी, योगेश पवार, ताहेर सौदागर, सचिन कांबळे, गोविंद शिंदे, परमेश्वर जोगदंड, दत्ता धोत्रे, प्रशांत ससाणे, अमोल गायकवाड, संदीप कांबळे, विक्रांत कांबळे, शुभम जोगदंड, बालाजी गायकवाड, राहुल कांबळे, सचिन कांबळे, सोपान शिंदे, माधव वाघमारे, अभिजीत कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी