LaturNews

करवाढ कमी करा, पुनर्वसन करा, २४ तास पाणी द्या....महाराष्ट्र विकास आघाडीचा मोर्चा

2017-10-11 22:42:15 823 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): महानगरपालिका हद्दीतील विविध प्रश्नांवर महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. फेरमुल्यांकनाच्या नावाखाली केलेली मालमत्ता करवाढ कमी करावी, गंजगोलाईत सार्वजनिक बांधकाम विभागच्या नियमानुसार भाडे आकारणी करावी, टपरीधारकांचे पुनर्वसन करावे, शादीखाना त्वरीत बांधण्यात यावा, वैदू समाजाला स्मशानभूमीसाठी अधिकृत जाग्स्स द्यावी, मांजरा धरण भरल्याने नळांना २४ तास पाणी द्यावे मगच मीटर बसवावे, मनपाचे उत्पन्न वाढवण्यासाठी फेरीवाला धोरणाची अमलबजावणी करावी, शहरातील रहदारीचे वाढते प्रमाण पाहता काही रस्ते वनवे करावेत, सुभाष चौक, हनुमान चौक, मार्केट यार्ड व गंजगोलाई भागात रिक्षांना प्रवेश देऊ नये, सोयाबीन हमी भाव केंद्रे सुरु करावीत, हमीभावापेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत अशा मागण्या या मोर्चाने केल्या. मोर्चाचे नेतृत्व विधिज्ञ अण्णाराव पाटील यांनी केले. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी