LaturNews

विश्रामगृहाच्या जागेसाठी वकील मंडळी रस्त्यावर, केले धरणे आंदोलन

12-10-2017 : 09:39:13 1713 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातुरच्या जिल्हा न्यायालयासाठी अशोक हॉटेल चौकातील जुन्या विश्रामगृहाची जागा द्यावी या मागणीसाठी लातुरच्या वकिलांनी धरणे आंदोलन केले. न्यायालयाच्या भिंतीला लागून असलेल्या फुटपाथवर हे आंदोलन झाले. विश्रामगृहाची जागा खाजगी विकासकाला बीओटी तत्वावर देण्यात आली आहे. यात अनेक अनियमितता आहेत. ही जागा परत घेण्याचा अधिकार सरकारला आहे, सरकार ती परत घेऊ शकते. लातुरची न्यायालयाची इमारत तालुका दर्जाची आहे. यातील अनेक दालने अपुरी आहेत, अनेक दालनेच नाहीत, पक्षकारांना थांबायला जागा नाही, पार्किंग अपुरी पडते, विश्रामगृहाची जागा मिळाल्यास न्यायालयाचे अनेक प्रश्न सुटू शकतात. आता जिल्हा दर्जाचे नवे न्यायालय उभे करायचे तर गावापासून १५ किलोमीटरवर जावे लागेल. हे अंतर सर्वांसाठीच त्रासदायक आहे असे वकील मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी सांगितले. आजचे आंदोलन केवळ इशारा आहे, यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करु असा इशारा देण्यात आला. या मागणीसाठी वकील मंडळाने यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक्मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. अमित देशमुख, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदने दिली आहेत. लवकरच मुख्यमंत्री लातूर दौर्‍यावर येत असल्याने आज हे आंदोलन करण्यात आले अशी माहिती काही वकिलांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ मनोहरराव गोमारे, व्यंकटराव बेद्रे, उदय गवारे, नामदेव काकडे, शरद इंगळे, अभिजित मगर, प्रदीप गंगणे, संजय पांडे, बळवंत जाधव, महेश शिंदे, केव्ही कुलकर्णी, डीके कुलकर्णी, शहाबुद्दीन शेख, नयना देवताळकर, विजय जाधव, तेजस्वी जाधव, संतोष नळेगावकर, दिग्विजय काथवटे, निवृत्ती करडे यांच्यासह अनेक वकील हजर होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी