LaturNews

लातुरचे लोक चांगले, संघटनाबाज-खंडणीखोरांना सोडणार नाही, हद्दपार करु- जिल्हाधिकारी

2017-10-12 23:09:16 1731 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातुरचे लोक चांगले आहेत. आजवर जेवढ्या ठिकाणी मी काम केलं त्यात सर्वाधिक चांगले लोक लातुरात आहेत. सकारात्मक बाबींना तातडीने चांगला प्रतिसाद देतात, सामाजिक उपक्रमात संवेदनशिलतेने वागतात. सहकार्य करतात. लातुरचं राजकीय वातावरणही चांगलं आहे. विकासासाठी राजकारण केले जात असल्याने इथं काम करणं आवडतं.....हे कौतुक केलंय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी. ‘माझं लातूर-माझं व्हिजन’ या संवाद उपक्रमात ते बोलत होते.
लातूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गुन्हेगारीचं प्रमाण कमी आहे. पण संघटनाबाजी करणे, खंडणी उकळणे, ब्लॅकमेल करणे असेही प्रकार पहायला मिळतात. अशांवर आमची सतत पाळत असते. जे गुन्हेगार आहेत त्यांना तडीपार करु, जे सुधारण्यासारखे आहेत त्यांना संधीही देऊ. पोलिस आपलं काम सक्षमतेने करीत आहेत. त्यांना सरळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्याला यश न आल्यास तडीपारी करावीच लागेल. लोकांना तक्रारी करता याव्यात यासाठीच मी माझा मोबाईल नंबर जाहीर केला आहे. आलेल्या तक्रारी जेवढ्या तत्परतेने सोडवता येतील तेवढ्या तत्परतेने सोडवत आहोत असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी