HOME   लातूर न्यूज

मोबाईल विक्रेत्यांचा बंद, ऑनलाईन विक्रीला विरोध

ऑनलाईन विक्रीमुळे स्थानिक व्यापार्‍यांच्या व्यवसायावर संक्रांत, बंदी घालण्याची मागणी

मोबाईल विक्रेत्यांचा बंद, ऑनलाईन विक्रीला विरोध

लातूर: ऑनलाईन विक्रीमधल्या आकर्षणामुळे अनेक स्थानिक व्यवसाय अडचणीत आले आहेत. लातूर जिल्ह्यातील सुमारे ६०० मोबाईल, अक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर विक्रेत्यांनी आजा बंद पाळला. याबाबत्चं एक निवेदन आज जिल्हाधिकार्‍यांना सुपुर्त करण्यात आलं. परदेशी कंपन्या भारतीय व्यापार्‍यांना माल देण्यास टाळाटाळ करतात आणि ऑनलाईन विक्रीला प्राधान्य देतात. भारतीय फयनान्स कंपन्या ऑनलाईन शॉपींग करणार्‍या ग्राहकांना अस्नेक सवलती देतात. या उलट स्थानिक व्यापार्‍यांवर अनेक प्रकारचे कर लावले जातात. त्यामुळे मंदीचे सावट आणखी गडद होत चालले आहे. स्थानिक व्यापार्‍यांवर उपासमारीचे संकट येऊ घातले आहे. बेरोजगारीही वाडःअत आहे. त्यामुळे फ्लीपकार्ट, अमेझॉन सारख्या ऑनलाईन कंपन्यांवर बंदी घालावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हधिकार्‍यांना भेटलेल्या शिषटमंडळात संजयकुमार गिल्डा, अविनाश वरयानी, महेफुज सय्यद, ओखाराम पोरिहित, चंदन धूत यांचा समावेश होता.


Comments

Top