HOME   लातूर न्यूज

शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या कुटुंबियांचे राज्यमंत्र्यांकडून सांत्वन

जिल्हा प्रशासनाने चित्ते कुटुंबियांना नियमाप्रमाणे सर्व आवश्यक मदत तात्काळ द्यावी

शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या कुटुंबियांचे राज्यमंत्र्यांकडून सांत्वन

लातुर: जम्मू-काश्मीरमधील बटालीक सेक्टर येथे ऑपरेशन रक्षक अंतर्गत सीमेवर कर्तव्य बजावताना १३ जानेवारीला ०१1- महार युनिटचे शहीद झालेले औसा तालुक्यातील आलमला येथील जवान सुरेश गोरख चित्ते यांच्या कुटुंबीयांची पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना व पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच चित्ते कुटुंबियांना शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी श्री बनसोडे यांनी शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या पत्नी, आई, लहान भाऊ व त्यांचे इतर नातेवाईक यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व सैन्यदल, केंद्र शासन व राज्य शासनाकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी सर्व प्रकारची मदत लवकरात लवकर मिळवून देण्यात येईल असे सांगितले. यावेळी औसा रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, श्री अफसर शेख व आलमला गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी श्री बनसोडे यांनी शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या दोन जुळ्या मुली व मुलगा यांना जवळ घेऊन त्यांची मायेने विचारपूस केली.
शासकीय विश्रामगृहात बैठक:-
सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आलमला येथे शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आल्यानंतर लातूर येथील शासकीय विश्रामगृहात औसा-रेनापुर चे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांच्यासोबत बैठक घेऊन शहीद जवानांच्या कुटुंबियांना सैन्यदल, केंद्र शासन व राज्य शासनाकडून देण्यात येणारी मदत तात्काळ देण्यात यावी असे निर्देश दिले.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी सैनिक कल्याण कार्यालयाकडून मदत म्हणून चाळीस हजाराचा धनादेश कुटुंबाला देण्यात आल्याची माहिती दिली तसेच इतर मदत ही सैन्यदलाचा अहवाल प्राप्त झाल्यावर तात्काळ देण्यात येईल असे सांगितले. तर उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी राज्य शासनाकडून देण्यात येनाऱ्या मदतीबाबत तत्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.


Comments

Top