HOME   लातूर न्यूज

अमित देशमुख यांनी घेतली पदाधिकारी अन मान्यवरांची भेट

मकर संक्रात व नूतन वर्षाच्या दिल्या शुभेच्छा

अमित देशमुख यांनी घेतली पदाधिकारी अन मान्यवरांची भेट

लातूर: भारतीय पौष महिन्यात येणारा मकर संक्रात हा सण कृषी संस्कृतीत महत्वाचा सण आहे. हा सण मोठया उत्साहाने साजरा करतात. दुर्गुणानी सदगुणावर केलेला विजय म्हणजे मकर संक्रात होय. मकर संक्रात व नूतन वर्षाच्यानिमीत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांची पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी भेट घेतली. या सर्वांना आमदार देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमख, व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, एसआर देशमुख, चेअरमन गणपतराव बाजुळगे, व्हा.चेअरमन शाम पाटील, जयसिंह देशमुख, टवेन्टिवन शुगर लि. समन्व्यक विजय देशमुख, लालासाहेब चव्हाण, नरेद्र अग्रवाल, दगडेसाहेब पडीले, व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, मनोज पाटील, संचालक सुर्यकांत सुडे, माजी उपसभापती लक्ष्मण पाटील, प्रा. विदयाधर कांदे पाटील, ज्ञानेश्वर पवार, एकनाथ पाटील, उदय देशमुख, समद पटेल, विदया पाटील, प्रताप शिंदे, मनोज चिखले, संभाजी सुळ, प्रकाश कासट, जब्बार सय्यद, जिवन सुरवसे, सचिन कांबळे, राजाभाऊ गवळी आदी पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होते.


Comments

Top