HOME   महत्वाच्या घडामोडी

महाराष्ट्र अडकू लागला जातीभेदाच्या विळख्यात

महाराष्ट्र अडकू लागला जातीभेदाच्या विळख्यात

मुंबई: महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण वाढू लागलं आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर लक्ष देण्यास पंतप्रधानांना वेळ मिळत नाही, भिमा कोरेगाव प्रकरणातही ते बोलले नाहीत. मराठी माणूस टिकला नाही तर मराठी भाषा कशी टिकेल? असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. औदुंबरच्या सदानंद साहित्य संमेलनात ते बोलत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत साहित्यिक उतरले, त्यांनी लेखणीही चालवली आज साहित्यिक कुठे आहेत? दक्षिणेतील तीन भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मराठीला मिळत मिळत नाही, कधी मिळणार? कदाचित उद्या कसलेही प्रयत्न न करता गुजरातीला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकतो. साहित्यिक, कवी यांनी मराठी माणसाच्या हिताची भूमिका घ्यायला हवी. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु होते आहे. बडोदा-मुंबई हायवेही होणार आहे. केवळ गुजरातचा विचार केला जातो यात मराठी माणूस कुठे आहे? असेही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.


Comments

Top