HOME   महत्वाच्या घडामोडी

तोगडिया म्हणतात एन्कॉऊंटरचा डाव होता! पद्मावत दाखवाल तर थिएटर जाळू, आधारसाठी आता चेहरा, पुजारी हटाव समितीचा अहवाल, अबू सालेमची सुनावणी ३१ ला, बीग बीचे अवैध बांधकाम नियमित......१६ जानेवारी २०१८

तोगडिया म्हणतात एन्कॉऊंटरचा डाव होता! पद्मावत दाखवाल तर थिएटर जाळू, आधारसाठी आता चेहरा, पुजारी हटाव समितीचा अहवाल, अबू सालेमची सुनावणी ३१ ला, बीग बीचे अवैध बांधकाम नियमित......१६ जानेवारी २०१८

* पोलिस एन्कॉऊंटर करणार असल्याची माहिती मिळाल्याने गायब झालो, विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचा खुलासा
* मी कसलंही चुकीचं काम केलं नाही, राम मंदीर आणि युवकांसाठी काम करीतच राहणार- प्रवीण तोगडिया
* राष्ट्रवादीच्या दुसर्‍या टप्प्यातील हल्ला बोल मराठवाडा यात्रेला तुळजापूरहून सुरुवात
* पतंजलीची उत्पादने आता ऑनलाईन मिळणार, रामदेव बाबांची घोषणा
* धारुरमध्ये पोलिसांची जीप पेटविण्याचा प्रयत्न ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
* सोनाई हत्याकांडाचे सहा आरोपी दोषी शिक्षेचा फैसला गुरूवारी
* परभणीच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड कामगार संघटनेचा संताप
* नापिकीस कंटाळून हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या
* अहमदपुरात लाच घेताना अभियांत्रिकी सहायकास अटक
* उदगीरमधील विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींना दोन वर्षांची शिक्षा
* लातूररोड रेल्वेस्थानकाच्या नामांतरास स्थानिकांचा विरोध
* वाशीममध्ये स्वस्त धान्य दुकानदारावर हल्ला लातूर जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा बंद.
* नगरसेविका सपना किसवे महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या नारी सन्मान पुरस्काराने सन्मानित
* पेट्रोल डिझेलचे भडकते भाव, अबकारी कर कमी करण्याची विरोधकांची मागणी
* हल्लाबोल यात्रा: १० दिवसात १८०० किलोमीटरचा टप्पा पार करणार, २७ सभांचं आयोजन
* सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचं बंड थंडावलं
* चेहऱ्याद्वारे होणार आधारकार्डची पडताळणी, बोटांचे ठसे न उमटल्यास चेहरा धरला जाणार ग्राह्य
* न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांच्यावर सात फेब्रुवारीला आरोपपत्र
* पुणे शहर बस वाहतूक सेवेतील १५८ बसचालक बडतर्फ
* सोलापुरात फटाक्याच्या गोदामाला आग २० जण गंभीर जखमी
* उस्मानाबादला निघालेल्या धनंजय मुंडे यांनी रस्ता अपघातातील मोटार सायकलस्वाराचे वाचवले प्राण
* सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या वसतीगृहात विद्यार्थीनीची आत्महत्या
* बंदुकीचा धाक दाखवून सुरक्षा कर्मचार्‍यानं नागपुरात केला बलात्कार
* ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेना तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार
* शहीद योगेश भदाणे यांच्यावर धुळ्यात सरकारी इतमामात अंत्यसंस्कार
* कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव समितीचा अहवाल सरकारला सादर
* येवल्यात तीन दिवसांचा पतंग महोत्सव, मंत्री गिरीश महाजनही झाले सहभागी
* ठाण्याच्या सरकारी दवाखान्यातून चोरीला गेलेलं सहा तासांचं बाळ पोलिसांनी शोधलं
* नितीन गडकरी यांनी केला नौदलाचा अवमान, पत्रपरिषदेत नौदलाच्या माजी अधिकार्‍यानं केली नाराजी व्यक्त
* गडकरी यांनी एकदा सीमेवर येऊन दाखवावं, नौदलाच्या माजी अधिकार्‍याचं आव्हान
* २६ जानेवारीला गेटवेवर सर्वपक्षीय संविधान बचाव शांती मार्च, राजू शेट्टी यांची संकल्पना
* कमला मील आग: आता तरी मुंबई महापालिकेनं आपला कारभार सुधारावा, उच्च न्यायालयाचं मत
* ‘पद्मावत’ सिनेमा रिलीज झाला ता सगळ्या चित्रपटगृहांना आग लावू, करनी सेनेचा इशारा
* मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यातील दोषी अभियंत्यांना निलंबित करा, ब्लॅक लिस्टमधील गुत्तेदारांची कामे काढून घ्या, कॉंग्रेसची मागणी
* ठाण्यात दोन कोटींचा विदेशी मद्याचा साठा जप्त
* पाच दिवसांच्या बंदनंतर मंबईतील सिद्धीविनायकाचं दर्शन सुरु
* इस्रायलचे पंतप्रधान आज ताजमहाल पाहणार
* दिल्लीतल्या महाराष्ट्र सदानातील कॅंटीनमध्ये दोन मराठी व्यक्तींना अडवले
* अबू सालेमच्या २००२ च्या प्रत्यार्पण खटल्याची पुढील सुनावणी ३१ जानेवारीला
* विशिष्ट वर्गाला खूष करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सूडभावनेचे राजकारण- काँग्रेसचे राजू वाघमारे
* साप साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार चंद्रकांत खैरे यांनी थांबवावा- रामदास कदम
* देशातील शहराच्या नामकरणात औरंगाबादचा समावेश नसल्याचे खैरे यांचे होते म्हणणे
* राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आहे की नाही ते पहावं- रामदास कदमांचा चंद्रकांत खैरेंना सल्ला
* देशीवर नाही तर देशावर प्रेम करा- खंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे नागपुरात तरुणांना आवाहन
* आम्ही सत्तेत असताना राज्यावर ०२ लाख ९० हजार कोटींचे कर्ज होते, आता ०८ लाख कोटींचा डोंगर- अजित पवार
* नदीपात्राच्या कडेने जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गाची राष्ट्रीय हरित लवादासमोर ०९ फेब्रुवारीला सुनावणी
* विद्यापीठ नामविस्तार वर्धापनदिनी रामदास आठवले यांची सभा उधळून लावण्याचा कट पूर्व नियोजित- पोलिस दल
* कमला मिल आग: अभिजीत मानकरला मदत करणार्‍या विशाल करियाला जामीन मंजूर
* कमला मिल आग: घटनेचा सविस्तर अहवाल मुंबई महापालिकेने सीलबंद लिफाफ्यात सादर करावा- हायकोर्टाचे निर्देश
* कमला मिल आग: आगीपूर्वी वन अबव्हने रूफटॉपसाठी पालिकेकडे अर्ज केल्याचे उघड, परिसरातील ०७ पबचे रूफटॉपसाठी अर्ज
* अमिताभ बच्चन, राजकुमार हिराणींसह ०७ जणांची अवैध बांधकामे महापालिकेने नियमित केल्याची माहिती अधिकारात माहिती
* सीए फायनल व सीपीटी परीक्षांचा निकाल बुधवारी होणार जाहीर
* अपेक्षित संख्याबळापेक्षा ५० टक्के कमी कर्मचारी असलेल्या मुंबई रेल्वे पोलिस दलाला हवी आठ तास ड्युटी
* नाशिक येथे शाळेच्या बाथरूममध्ये बसचालकाचे आठ वर्षीय बालिकेशी अश्लील वर्तन, गुन्हा दाखल
* उर्दू भाषा भारताचीच, संस्कृत तिची मूळ भाषा, उर्दूची सांगड मुस्लिम धर्माशी घातल्याने सामान्यांची भाषा झाली नाही- गझलकार नासीर शाकेब
* नाशिक येथे आंघोळ करताना शॉवरमध्ये वीजप्रवाह उतरल्याने डॉक्टरचा मृत्यू
* दीपक मिश्रांवर आरोप करणार्‍या न्यायाधीशांचा महत्त्वाच्या खटल्यांसाठी पाच सदस्यीय घटनापीठात समावेश नाही
* नरेंद्र मोदी ‘क्रांत‌िकारी’ नेते, त्यांनी क्रांतिकारी परिवर्तन घडवले, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू
* भारत-इस्रायलदरम्यान नऊ क्षेत्रांमध्ये करार
* सायबर सुरक्षा, चित्रपट, पेट्रोलियम, विमानसेवा, संरक्षण, कृषीविज्ञान, तंत्रज्ञान विकास आयुर्वेद, होमियोपॅथी, अंतराळ, सौर ऊर्जा क्षेत्रांचा समावेश
* मध्य प्रदेशात शाळेत 'पद्मावत' मधील घुमरवर नृत्य केल्याने करनी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड
* दूरसंचार क्षेत्रातील ५० हजार नोकऱ्या सहा महिन्यांत जाणार असल्याची भीती अहवालात व्यक्त
* काबूलमधील भारतीय दूतावासाच्या आवारात रॉकेट हल्ला, सर्व अधिकारी सुखरूप- परराष्ट्र मंत्रालय
* सैन्य दिनी भारतीय लष्कराने केला सात पाकिस्तानी जवानांचा खात्मा


Comments

Top