HOME   महत्वाच्या घडामोडी

आ. कडूंना एक वर्षाची शिक्षा, अनाथांना एक टक्का आरक्षण, साडेचार कोटींचा मुख्यमंत्री बोलतोय, दुष्काळी पट्ट्यात सौर पंप, पोलिसांना ०८ तासांची ड्युटी......१७०११८

आ. कडूंना एक वर्षाची शिक्षा, अनाथांना एक टक्का आरक्षण, साडेचार कोटींचा मुख्यमंत्री बोलतोय, दुष्काळी पट्ट्यात सौर पंप, पोलिसांना ०८ तासांची ड्युटी......१७०११८

* शासकीय नोकरीत अनाथांना एक टक्का आरक्षण, मंत्रीमंडळाचा निर्णय
* मागासवर्गियांना खुल्या प्रवर्गात प्रवेश का नाही? उच्च न्यायालयाचा सवाल, एमपीएस्सीची प्रवेश प्रक्रिया स्थगित
* राज्याच्या तिजोरीत काहीच नसताना ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमावर साडेचार कोटी रुपयांचा खर्च
* आमचे सरकार आल्यावर दुष्काळी पट्ट्यात सौर उर्जा पंप देणार- अजित पवार
* मुंबईतल्या पोलिसांना आता आठ तासांची ड्युटी
* सेंचुरीयन कसोटीत दक्षिण अफ्रिकेनं उडवला भारताचा धुव्वा
* पोलिसाला मारहाण केल्या प्रकरणी आ. बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा, जामीनही मिळाला
* न्या. ब्रिजमोहन लोया यांच्या मत्यू प्रकरणाची सुनावणी एक आठवड्याने पुढे ढकलली, प्रकरण देशभर चर्चेत
* तपास, पोस्टमार्टेम आणि फॉरेन्सिक रिपोर्टनुसार न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने- शिवाजी बोडखे, सहपोलिस आयुक्त, नागपूर
* इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिली ताजमहलला भेट, खास मेजवानीचं आयोजन
* राज ठाकरे यांच्या घरासमोर आणि घरामागे हॉकर्स झोन, फेरीवाले बसणार
* अमिताभ बच्चन यांच्यासह सात बड्या व्यक्तींनी बंगल्यात केलेली अवैध बांधकामे केली वैध
* कमला मील आग: मोजोस पबचा मालक योग तुलीला २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
* आगामी लिकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांच्या पदाधिकार्यांना सूचना
* २६ जानेवारी रोजी भाजपा काढणार प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली, विरोधकांच्या संविधान रॅलीला उत्तर
* संविधान रॅलीत कॉंग्रेसही होणार सहभागी, प्रत्येक जिल्ह्यात संविधान रॅली
* विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन
* सतत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, लढतच राहणार- प्रवीण तोगडिया
* ओशो रजनीश मृत्यूपत्र प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे का सोपवत नाही? उच्च न्यायालयाचा सवाल
* मुंबई: मूल होत नसल्याने बायकोने मारले सतत टोमणे, ही क्रूरता, उच्च न्यायालयाने दिली ६२ वर्षीय व्यक्तीला घटस्फोटाची मान्यता
* राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा आज दुसरा दिवस भूम पाटोदा बीडमध्ये जाहीर सभा
* इस्रायलच्या पंतप्रधानांसह नरेंद्र मोदी करणार आज गुजरातेत रोड शो
* हज यात्रेवरील ७०० कोटींचं अनुदान बंद, टप्प्याटप्प्याने झाले अनुदान बंद
* हज यात्रेच्या अनुदानाचे ७०० कोटी मुस्लिम मुलींचे शिक्षण आणि अल्पसंख्यांक महिला कल्याणासाठी राज्य खर्च करणार
* दुधाला २७ रुपयांचा भाव द्यावा, महादेव जानकरांना सुकाणू समितीचे साकडे
* पाक आणि चीन नियंत्रण रेषांवरील भारतीय जवानांना मिळणार ७२ हजार अॅसॉल्ट रायफली
* राज्यात प्लॅस्टिकचा संपूर्णपणे वापर, निर्मिती थांबविण्याची अधिसूचना
* प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोल प्लेटस्, ताट, वाट्या, चमचे, कप, ग्लास, बॅनर, तोरण, ध्वज, प्लॅस्टिक वेष्टनांचा समावेश
* तांत्रिक कारणांसह विमान कंपनीची तयारी नसल्याने कोल्हापूरची विमानसेवा लांबणीवर
* मुंबई विद्यापीठअंतर्गत फेब्रुवारी अखेरीस ६२ नवीन महाविद्यालयांची भर
* पुणे परिसरात ५२८ कोटींच्या चोरीपैकी अवघे २५ कोटी जप्त
* समृद्धी महामार्ग जमीन दर तफावत दूर करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील फतियाबादच्या शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा निर्णय
* चंद्रपूर जिल्ह्यात ०३ अल्पवयीन मुलींवर खर्रा आणि दहा रुपयांचे आमिष दाखवून अत्याचार करणारे गजाआड
* औरंगाबाद जिल्ह्यातील सिंदोन जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून सुरू केले वाचनालय
* आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कॅमेरा बसविण्यास पश्चिम रेल्वेचा निर्णय
* मुंबई आयआयटी वसतिगृहात विद्यार्थ्यांना मांसाहारासाठी खानावळीचे स्टीलचे ताट न वापरण्याच्या सूचना
* मुंबईतील थंडी गायब, पारा गेला ३५ अंश सेल्सिअसवर
* देशातील १४ ते १८ वयोगटातील २५ टक्के विद्यार्थ्यांना नीट वाचता येत नाही- सर्व्हेक्षण
* भिमा कोरेगावचा हिंसाचार विरोधकांचा कट, राजकीय फायद्यासाठी जातीय तंटे लावले जात आहेत- मुख्यमंत्री
* संभाजी भिडे यांना आरआर आणि जयंत पाटील यांनी मोठे केले- काँग्रेसचे हुसेन दलवाई
* औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक प्रा. दिनकर बोरीकर यांचे निधन
* उत्तर प्रदेश राज्य हज समितीच्या कार्यालयाला भगवा रंग देणारे हज समितीचे सचिव आर. पी. सिंह यांची उचलबांगडी
* सीबीआयकडून व्यापम घोटाळा प्रकरणी ९५ जणांवर आरोपपत्र दाखल
* नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या पायाभूत समितीची ३० जानेवारी रोजी बैठक
* पुणे येथे २६ जानेवारीपासून मिळणार आरे दूध
* काँग्रेस आणि दुष्काळ दोघे जुळे भाऊ, जेथे काँग्रेस जाईल तेथे दुष्काळ जातो- पंतप्रधान


Comments

Top