HOME   महत्वाच्या घडामोडी

आ. कडू यांना एक वर्षाचा कारावास, जामीनही मिळाला

पोलिसाला मारल्याचं प्रकरण, उच्च न्यायालयात दाद मागणार

आ. कडू यांना एक वर्षाचा कारावास, जामीनही मिळाला

अचलपूर: नेहमीच आक्रमक भूमिकेत असलेल्या आ. बच्चू कडू यांना पोलिसाला मारहाण केल्या प्रकरणी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २४ मार्च २०१६ रोजी परतवाडा येथील बस डेपोजवळ उभ्या असलेल्या खाजगी बसेसबद्दल कडू यांनी या पोलिसाकडे विचारणा केली होती. या पोलिसाकडून प्रतिसाद न मिळाल्याने कडू यांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप होता. पिडीत पोलिसाचे नाव इंद्रजित चौधरी असून या प्रकरणी कडू यांच्या विरोधात सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचे कलम लावण्यात आले होते. शिवाय ३३२, १८६ कलमही परतवाडा पोलिसांनी लावले होते. कडू यांना एक वर्षाचा कारावास आणि ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कडू यांनी यापूर्वीही असे अनेक प्रकार केले आहेत. दरम्यान या प्रकरणात कडू यांना जामीनही मिळाल्याचे वृत्त आहे. आपण न्यायालयाचा आदर करतो, हे काम आपण लोकांसाठी केले होते, यापूर्वी वाहतुकीला शिस्त नसल्यानं चौघांचा बळी गेला होता म्हणून आपण विचारणा केली होती. यापुढेही लोकांसाठी काम करीत राहू, या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असे कडू यांनी सांगितले.


Comments

Top