HOME   लातूर न्यूज

सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाच्या पुर्वतयारीचा आढावा

तयारी वेळेत पुर्ण करा- आयुक्त हांगे, समन्वयक हर्षल गायकवाड

सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाच्या पुर्वतयारीचा आढावा

लातूर: सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाच्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्तांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस देवस्थांनचे विश्र्वस्त तथा यात्रा संयोजक अशोक भोसले, बाबासाहेब कोरे, माजी स्थायी समिती तथा मनपा सदस्य विक्रांत गोजमगुंडे, उपायुक्त हर्षल गायकवाड, रमेश बिसेन, सुरेश गोजमगुंडे, व्यंकटेश हालिंगे, गोपे, गोरोबा लोखंडे यांच्यासह धर्मादाय कार्यालयाचे निरिक्षक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त हांगे यांना कांही सुचना केल्या. त्यानुसार आयुक्तांनी अहिल्यादेवी होळकर चौक ते सिद्धेश्वर देवस्थानपर्यंत येणाऱ्या रस्त्याचे तात्काळ पॅचअप करुन घ्यावे असे आदेश बांधकाम विभागाला दिले. त्याचबरोबर यात्रा महोत्सव सुरु होण्यापुर्वी साळे गल्ली ते सिद्धेश्वर मंदिर या दरम्यान नवीन पथदिवे कायमस्वरुपी उभे करण्यात यावेत असे आदेशही विद्युत विभागास आयुक्तांनी दिले. या सुचनेनुसार केलेल्या कामाची पाहणी करण्यासह आढावा घेण्याकरीता मनपा आयुक्त हांगे ०७ फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सवाच्या स्थळी येणार आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये व सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा याकरीता समन्वयक अधिकारी म्हणून उपायुक्त हर्षल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीस सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप चिद्रे, विद्युत विभागाचे जरीचंद्र ताकपीरे, रमाकांत पिडगे, सुर्यकांत राऊत, बामणकर, यांच्यासह मनपाचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.


Comments

Top