टॉप स्टोरी

लोग खत लिख कर कहते है, मोदी थक मत जाना....मन की बात

25-12-2016 : 01:14:28 Topstory, 5572 Views 0 Comments

नवी दिल्ली: ‘लोग पत्र लिखकर कहते हैं कि मोदीजी थक मत जाना, रुक मत जाना, मैं कहना चाहता हूं की यह तो अभी शुरुआत है. यह जंग जितनी है. थकने का तो सवाल ही पैदा नहीं होता.’....पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षातल्या अखेरच्या ‘मन की बात’ मध्ये आकाशवाणीवरुन बोलत होते. नोटाबंदीनंतरचा हा त्यांचा दुसरा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदी यांनी ख्रिस्मसच्या शुभेच्छा दिल्या. अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण करीत त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाजपेयी यांना देश विसरु शकत नाही, त्यांनी विकासाची अनेक कामे केली असा गौरव केला. आज सुरु होणार्‍या दोन योजनांची माहिती त्यांनी दिली. कॅशलेस व्यवहार करणार्‍यांसाठी आजपासून १०० दिवस लकी ड्रॉ काढला जाईल. पंधरा हजार नागरिकांना प्रत्येकी हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. कॅशलेस व्यवहार करणार्‍या व्यापार्‍यांनाही करात सवलत दिली जाईल. अलिकडे अनेक ठिकाणी जुन्या आणि नव्या नोटा पकडल्या जातात. याची माहिती जनतेकडूनच मिळते. नोटाबंदीचा निर्णय अयशस्वी करण्यासाठी विरोधी पक्षांनी अनेक अफवा पसरवल्या. पण लोकांनी यावर विश्वास ठेवला नाही. नोटाबंदीवर विरोधकांनी संसदेचं कामही चालू दिलं नाही. नोटाबंदीपासून वारंवार निर्णय बदलले जातात. याचाही उल्लेख मोदी यांनी केला. लोकांच्या सोयीसाठीच निर्णयात दुरुस्त्या केल्या जातात. ‘लोग पत्र लिखकर कहते हैं कि मोदीजी थक मत जाना, रुक मत जाना, मैं कहना चाहता हूं कि यह तो अभी शुरुआत है. यह जंग जितनी है. थकने का तो सवाल ही पैदा नहीं होता.’

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!