टॉप स्टोरी

महामार्गावरील दारु दुकानदारांची वरिष्ठांकडे धाव, लाखो होणार बेरोजगार

2016-12-27 23:44:11 Topstory, 7618 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील दारु दुकाने बंद करण्याच्या निर्णयाने देशभरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा मार्गावरील पाचशे मीटरच्या आतील दुकाने हटवावीत असा आदेश न्यायालयाने दिल्याने ग्राहक आणि दुकानदारातून नापसंती व्यक्त होत आहे. अशा पद्धतीने दुकाने, बार हटवण्याची वेळ आल्यास लातूर जिल्ह्यातील जवळपास ३४५ दुकाने-बार बंद करावे लागतील. यातून मोठे नुकसान तर होईलच शिवाय हजारो कुटुंबांची रोजी रोटी हरवणार आहे. याशिवाय बार मालक-चालक, बियर शॉपींना कर्जाचा हप्ता कसा फेडायचा हा प्रश्न सतावणार आहे. महामार्गावरील बार आणि बियर शॉपी मालकांनी लाखो रुपयांचे कर्ज काढलेले असते ते कसे फेडायचे असाही प्रश्न निर्माण होत आहे. या सगळ्या प्रश्नांउळे हैराण झालेल्या लातूर बारचालक संघटनेनं उत्पादन शुल्क विभागाकडे धाव घेतली आहे. राज्याच्या संचालकांकडे निवेदन सुपूर्त केले आहे. हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली अशी माहिती ज्ञानदेव जठार यांनी दिली. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी लातूर जिल्हा बार संघटनेचे सल्लागार सुहास चामले यांनी केली आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!