टॉप स्टोरी

कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन.... आ. अमित देशमुख

30-12-2016 : 02:09:33 Topstory, 6182 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): अच्छे दिन नको, कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन अशी अपेक्षा आ. अमित देशमुख यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत सुरत शाहवली येथे दर्गा विकास कामाचा शुभारंभ आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. नोटाबंदीमुळे तमाम भारतीय त्रस्त आहेत. एका रात्रीतून नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला. हजार पाचशेच्या नोटा आता फक्त रंगीत कागदाचा तुकडा बनून राहिल्या आहेत. नोटाबंदीच्या ५० दिवसात मोदी सरकारने ६० वेळा निर्णय बदलले, याचा त्रास जनतेला झाला. काळा पैसा संपवायचा आहे, खोट्या नोटा पकडायच्या आहेत, दहशतवादाचा सामना करायचा आहे असं नोटाबंदीवेळी सांगण्यात आलं. नोटाबंदीला विरोध नाही पण त्यासाठी वापरलेली पद्धती चुकीची आहे. पाचशे हजाराच्या सगळ्या नोटा बॅंकेत आल्या मग काळा पैसा गेला कुठं असा प्रश्न आ. अमित देशमुख यांनी केला. राज्याच्या अनेक मंत्र्यांच्या गाड्यात पैसा सापडला पण तरीही हे संगतात आम्ही भ्रष्टाचाराचा सामना करीत आहोत, अच्छे दिन कधी येणार? नको तुमचे अच्छे दिन, ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन’ अशी मार्मिक टिपण्णी आ. देशमुख यांनी केली. नोटाबंदीच्या काळात शंभर सव्वाशे लोकांवर मृत्यू ओढावला, त्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे असा सवालही आ. देशमुख यांनी केला. यावेळी सभापती विक्रांत गोजमगुंडे, महेश काळे, रमेश बिसेन, यशवंत भोसले, व्यंकट बेद्रे, आयुक्त रमेश पवार, महापौर दीपक सूळ, मोईज शेख, समद पटेल, नरेंद्र अग्रवाल, अहमदखान पठाण, कैलास कांबळे, दगडू मिटकरी, अनंत चौधरी यांच्यासह गावभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!