टॉप स्टोरी

सर्वात आधी गोमारे, गवारे, गोविंदपूरकर बसवणार नळांना मीटर्स

31-12-2016 : 07:25:26 Topstory, 10575 Views 0 Comments

मीटरचे प्रकरण नव्या वळणावर, जनतेला निवडू द्या, सक्ती करु नका!
लातूर (आलानेप्र): लातुरचं पाण्याचं मीटर प्रकरण वारंवार नवं वळण घेत आहे. आधी मीटर्सना विरोध करणार्‍या गोमारे, गोविंदपूरकर आणि गवारे यांनी कंपनी निघून गेल्यावर मीटर्स बसवण्याची तयारी दाखवली. दरम्यान मनपाने मीटर्स बसवण्यासाठी २० जानेवारी ही अखेरची तारीख दिली. मनपाच्या नियमाप्रमाणे जनतेनेच मीटर्स खरेदी करुन बसवावीत असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर २० तारखेपर्यंत मीटर्स न बसवणार्‍यांची नळ जोडणी तोडली जाईल असाही इशारा देण्यात आला. या दोन्हीपैकी मनपा नेमके काय करणार याचा खुलासा होऊ शकला नाही. दरम्यान आज नागरी हक्क संरक्षण समितीने आज बैठक घेतली. नागरिकांना मीटर्सची खरेदी करु द्यावी असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. आमचा पाण्याच्या मीटर्सना विरोध नाही. पण कंपनीला विरोध होता. जनतेचे पैसे वाचावेत, मनपाचे पाणीही वाचावे असा उद्देश आहे असं अशोक गोविंदपूरकर यांनी सांगितले. येत्या सोमवारी ज्येष्ठ सामाजिक नेते मनोहरराव गोमारे, अशोक गोविंदपूरकर, उदय गवारे आणि बसवंताप्पा भरडे आपापल्या नळांना मीटर्स बसवून घेणार आहेत. याची घोषणा या चौघांनी आजच्या बैठकीत केली. सोमवारी नागरी हक्क संरक्षण समिती पत्रकार परिषद घेऊन नव्या अधिकृत मीटर्सची माहिती देणार आहे. या बैठकीला जमील नाना शेख, ओमप्रकाश आर्य, भालचंद्र कवठेकर, अजय कलशेट्टी उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!