टॉप स्टोरी

धीरज देशमुखांच्या जिल्हा परिषद प्रवेशाला निरीक्षकांची संमती!

03-01-2017 : 03:13:27 Topstory, 3560 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): आ. अमित देशमुख यांचे तिसरे बंधू, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज देशमुख यांच्या जिल्हा परिषद प्रवेशाला कॉंग्रेस पक्ष निरीक्षकांनी संमती दर्शवली आहे. काल नोटाबंदीच्या विरोधातील आंदोलनासंदर्भात निरीक्षकांनी कॉंग्रेस भवनात बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्र परिषदेत निरीक्षक तुकाराम रेंगे पाटील यांनी धीरज देशमुख यांचा मार्ग सुकर केला. जो व्यक्ती काम करतो त्याला असा अधिकार मिळालाच पाहिजे असं ते म्हणाले. लातूर जिल्हा परिषदेत बहुमत आल्यानंतर सारं काही ठरेल. या जिल्हा परिषदेत कॉंग्रेसला बहुमत मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहोत. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून धीरज देशमुख यांनी चांगले काम केले आहे. अर्थातच त्यांना या निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे, तुमच्या मनात जे आहे ते नक्कीच होईल असं रेंगे पाटील यांनी सांगितलं. नोटाबंदीच्या विरोधात मोदी सरकारच्या निर्णयांच्या विरोधात सहा आणि आठ जानेवारीला आंदोलन केले जाईल. मोदींनी दिलेली आश्वासने विसरली. उलट नको ते निर्णय जनतेवर लादले जात आहेत. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर आंदोलन केले जाईल. हे आंदोलन जनतेसाठी आहे. यात जनतेनेही सहभागी व्हावं असं आवाहन रेंगे पाटील यांनी केले. यावेळी टीपी मुंडे, लातूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष व्यंकट बेद्रे, शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, अशोकराव पाटील निलंगेकर, धीरज देशमुख, महापौर दीपक सूळ, वैजनाथराव शिंदे, स्मिता खानापुरे, सुनिता आरळीकर उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!