टॉप स्टोरी

गंजगोलाईला १०० वर्षे पूर्ण, मनपा करणार सात कोटींचा विकास

2017-01-04 18:59:30 Topstory, 6533 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर शहराची ओळख असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गंजगोलाई संकुलाला २०१७ मधेय १०० वर्षे पूर्ण होत आहेत. समस्त लातुरकरांचा अभिमान असलेल्या या संकुलाचा आता विकास केला जाणार आहे. विकासाचा आराखडा मनपाने तयार केला असून या संकुलाला जोडल्या गेलेल्या १६ रस्त्यांचाही विकास केला जाणार आहे. या आराखड्यात हे संकुल आणि १६ रस्त्यांचे सुशोभिकरणही केले जाणार आहे. यासाठी सात कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी समितीच्या बैठकीनंतर आजलातूर-नेटवाणीशी बोलताना दिली. या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रम-कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी एक कृती समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत व्यापारी, नगरसेवक आणि नागरिकांचा समावेश असेल असे गोजमगुंडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने चित्रकला, वक्तृत्व, निबंध आणि पोस्टर स्पर्धा घेण्याची सूचना सदस्या सुनिता चाळक यांनी केली. गंजगोलाईतील अतिक्रमणे हटवावीत, १६२ भाडेकरुंचं पुनर्वसन करावं आणि गोलाई ग्रीन करावी अशी मागणी चंद्रकांत चिकटे यांनी केली.
यादवांवर कारवाई!
ही बैठक सुरु असताना पाणी पुरवठ्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यातील कुठल्याही प्रश्नावर अभियंता डीजी यादव यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. यामुळे नगरसेवक सुनिता चाळक, राजकुमार जाधव, चंदकांत चिकटे, रवीशंकर जाधव, सभापती गोजमगुंडे, आयुक्त रमेश पवार यांनी यादवांची अक्षरश: खरडपट्टी काढली. कामात सुधारणा न झाल्यास कायदेशीर कारवाई करु अशी तंबी सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
या बैठकीला आयुक्त रमेश पवार, नगर सचिव सुनील चनवडे, उपायुक्त संभाजी वाघमारे, सह आयुक्त उज्वला शिंदे, स्मिता खानापुरे, सुरेश पवार, नरेंद्र अग्रवाल, सुनिता चाळक, समद पटेल, कविता वाडीकर, महादेव बरुरे, रवीशंकर जाधव, स्नेहलता अग्रवाल, राजकुमार जाधव, चंद्रकांत चिकटे, कैलास कांबळे, सुरेखा इगे, नगर रचनाकार संजय देशपांडे, अभियंता नवनाथ केंद्रे, डीजी यादव, सल्लाउद्दीन काझी, संजय कुलकर्णी, लेखापाल सविता जंपावाड, सुरेश पांढरे, रमाकांत पिडगे, खदीर शेख, रुक्मानंद वडगावे उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!