टॉप स्टोरी

बंगलोरातील विनयभंग प्रकरणी चौघांना अटक, दोघे फरार

05-01-2017 : 07:54:24 Topstory, 8217 Views 0 Comments

बंगलोर: ३१ डिसेंबरच्या रात्री घराकडे परतणार्‍या एका तरुणीचा तरुणांनी बर रस्त्यात विनयभंग केला. या घटनेच्या पाचव्या दिवशी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. लिनो, राजू, अय्यप्पा आणि सोमा अशी या अटक झालेल्या चौघांची नावे आहेत. बंगलोरात कमनहल्ली मार्गावर हा प्रकार घडला. याची चित्रे सीसीटीव्हीत कैद झाली होती. विनयभंग करताना एक तरुण व्हिडीओत दिसतो. जवळपास ३० सेकंद विनयभंग करुन या तरुणीला गाडीवर बसवून नेण्याचा प्रयत्न झाला. या तरुणीने आरडाओरड केल्यानंतर या तरुणींना त्या दोघांनी रस्त्यावर ढकलून दिले होते. दुचाकीवर हे दोन तरुण आले होते. पण त्यांच्या सोबतीला आणखी चौघे होते ही बाब उघडकीस आली आहे. ही तरुणी आठवडाभरापूर्वीच बंगलोरात आली होती. ती कुठे राहते, कुठे काम करते याची माहिती या तरुणांनी घेतली होती असेही उघड झाले आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली. आणखी दोघे फरार आहेत.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणखी एक प्रकार घडला होता. अशा घटना होतच असतात अशी प्रतिक्रिया गृहमंत्री परमेश्वरा यांनी दिली होती. नंतर त्यांनी चांगलीच सारवासारव केली केली होती. महिलांच्या सुरक्षेसाठी बंगलोरात सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. पोलिस हेल्पलाईनची संख्या शंभरावर नेली जाणार आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!