टॉप स्टोरी

बॅंकेतील सर्वसामान्यांचा पैसा ठरला खोटा, सत्ताधार्‍यांकडे सापडत आहेत करोडोंचा नोटा!

2017-01-06 18:42:17 Topstory, 5074 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): इमानदारी का पिटते हो ढोल, अब इनकी खुल गई पोल! देशभक्तीचे कुंकू नोटाबंदीच्या भांगेत, मल्ल्या लंडनमधे अन गोरगरिब रांगेत! आमची मागणी समजून घ्या जरा, काळ्या पैशातून शेतकरी कर्जमाफी करा! बॅंकेतील सर्वसामान्यांचा पैसा ठरला खोटा, सत्ताधार्‍यांकडे सापडत आहेत करोडोंचा नोटा! या घोषणा आणि फलक पहायला मिळाले लातूर कॉंग्रेसच्या मोर्चात. लातूर कॉंग्रेसने नोटाबंदीमुळे झालेली सर्वसामान्यांची अडचण मोर्चाद्वारे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तहसीलवर काढलेल्या या मोर्चाने निवेदन दिले, पण यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, नेते बसवराज एस राजू, त्र्यंबकदास झंवर, राजेसाहेब सवई, मोईज शेख, सुनिता आरळीकर यांनी नोटाबंदी आणि मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध आपली मते मांडली. यावेळी वैजनाथ शिंदे, आबासाहेब पाटील, प्रा. शिवाजी जवळगेकर, दत्तात्रय बनसोडे, एसआर देशमुख, संतोष देशमुख, गोविंद घार, सुभाष गायकवाड, दगडू पडीले, नरेंद्र अग्रवाल, समद पटेल, राजाभाऊ मोरे, सपना किसवे, स्मिता खानापुरे, डॉ. विजय अजनीकर, महेश काळे, संजय पाटील खंडापूरकर, आनंद वैरागे, जब्बार पठाण, पुनित पाटील, राजेश खटके, दत्ता म्हस्के, माधव गंभीरे, विक्रम हिप्परकर, उषा देशमुख, उषा कांबळे, केशरबाई महापुरे, रेखा नावंदर, गोटू यादव, शैलजा आराध्ये यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!