टॉप स्टोरी

मीच एकटा शिक्षकांचा प्रतिनिधी, बाकी सगळे संस्थाचालक घुसखोरी हाणून पाडा- प्रा. भालचंद्र येडवे

2017-01-07 17:02:15 Topstory, 5909 Views 0 Comments

‘आता हवा बदल नवा!’
लातूर (आलानेप्र): शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणारा लढवय्या नेता आता उरला नाही, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता शिक्षकांचाच प्रतिनिधी हवा, या मतदारसंघात संस्थाचालकांनी घुसखोरी केल्याने शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, या संस्थाचालकांची घुसखोरी हाणून पाडा असे आवाहन मराठवाडा शिक्षक बचाव कृती समितीचे उमेदवार भालचंद्र येडवे यांनी केले. लातूरच्या मिलिंद विद्यालयात येडवे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान प्राचार्य अंगद तांदळे यांनी भूषवलं. या प्रसंगी राहूल माने, बालाजी कांबळे, व्हीआर गायकवाड, आत्माराम गिते, विजय श्रृंगारे, संतोष कापसे, एम एम कुरसुळे, अशोक चव्हाण, आत्माराम दंडिमे, संतोष इंगळे, व्हीजी पाटील, ताहेर शेख, वहाब जुनैदी, विजय गायकवाड, एलटी बामणे, डॉ सुरेश बडोले, एमयू पाटील, विलास गायकवाड उपस्थित होते.
यावेळी उपस्थित प्राध्यापक आणि शिक्षकांनी प्रा. येडवे ही नवी कोरी पाटी आहे. त्यांच्याच माध्यमातून न्याय मिळेल असे सांगत शिक्षकांच्या प्रतिनिधीच्या पाठीशी उभे राहवे असे आवाह्न केले. याआधी संस्थाचालकच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने शिक्षकांना न्याय मिळाला नाही. या संस्थाचालकांनी आमदारकीच्या माध्यमातून केवळ आपापल्या संस्था टिकवण्याचे काम केले. या प्रयत्नात अडचणीतल्या शिक्षकाला मात्र न्याय मिळाला नाही. आता शिक्षकांचा खराखुरा प्रतिनिधी विधानपरिषदेत पाठवणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. भालचंद्र येडवे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असला तरी त्यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर लढताना लाठ्या काठ्या खायच्या आणि आमदारकी मात्र संस्थाचालकांनी मिळवायची. त्यातून फक्त राजकारण करीत आपल्या संस्था वाचवायच्या हे किती काळ चालू द्यायचे असा प्रश्नही प्रा. येडवे यांनी केला आहे. या निवडणुकीत उभ्या असलेल्या आठ उमेदवारांपैकी केवळ प्रा. येडवे शिक्षक उमेदवार आहेत. बाकी सगळे संस्थाचालक आहेत ही बाब या निमित्ताने लक्षात घेता येईल.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!