टॉप स्टोरी

लातुरचा कचरा सलाईनवर, वाहतुकदार गेले संपावर

2017-01-09 22:36:34 Topstory, 7036 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातुरच्या कचर्‍यावर नेहमीच संक्रांत येत असते. आता काही दिवसांवर संक्रांत आली आहे. पुन्हा कचर्‍यावर संक्रांत आली आहे. कचरा वाहतुकीचे दर वाढवून द्यावे यासाठी लातुरचे कचरा वाहतुकदार आज संपावर गेले आहेत. हे सगळे वाहतुकदार आज टाऊन हॉलच्या मैदानावर ठिय्या देऊन बसले. त्यांनी सगळी कचरा वाहणारी वाहने टाऊन हॉलच्या मैदानावर आणून लावली. महानगरपालिकेच्या प्रशासनाने या मैदानावर येऊनच आमच्याशी बोलणी करावी असा आग्रह या आंदोलकांनी धरला. या आंदोलनात ४० ट्रॅक्टरचालक, ७० आपेचालक आणि १२ टिप्परचालक सहभागी झाले होते. मुळात अनेक वर्षांपासून कचरा वाहतुकीचे दर तेच आहेत. यात कसलीही वाढ झाली नाही. यावर वाहतुकदारांचा आक्षेप आहे. या आंदोलनात रत्नाकर निलंगेकर, महेंद्र कांबळे, बाळासाहेब रेनकुळे, सूर्यकांत सरवदे, किरण टिळक, भागवत सरतापे, मन्मथ स्वामी, हनमंत कासारे, महादेव कांबळे, उमाकांत चंदनशिवे, विकास कांबळे, सतीश कांबळे, बळी कांबळे सहभागी झाले होते. आज संध्याकाळी मनपा आयुक्तांनी हस्तक्षेप केला आणि पाच दिवसांचा अवधी मागून घेतला अशी बातमी आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!