टॉप स्टोरी

लातुरात निघाला बहुजन क्रांती मोर्चा

14-01-2017 : 08:11:25 Topstory, 8174 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर जिल्ह्यातील बहुजन समाजातील अनुसुचित जाती जमाती, भटके विमुक्त जाती जमाती, ओबीसी, मराठा, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, लिंगायत, शीख, जैन आणि शिवधर्मीय या समाजातील आरक्षणासाठी आज लातुरात बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. देशभरातील बहुजनांचे हक्क आणि अधिकार नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जात आहे असा आरोप या मोर्चाने केला आहे.
कोपर्डीच्या अपराध्यांना फाशी द्यावी, महादेव कोळी समाजाची जात प्रमाणपत्राची जाचक अट रद्द करावी, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी, ओबीसी, एसबीसी, भटक्या विमुक्त जातीची जातीनिहाय जनगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, मुस्लीमांना १५ टक्के आरक्षण द्यावे, मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण द्यावे अशा मागण्या या मोर्चाने केल्या. यात प्रा. संगमेश्वर पानगावे, प्रशांत जानराव, बालाजी कांबळे, प्रा. अंतेश्वर गायकवाड, सनी बनसोडे, बंडुसिंग ठाकूर, मच्छींद्र कांबळे, इस्माईल कासमी, रवीशंकर काला, दयानंद बिराजदार सहभागी झाले होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!