टॉप स्टोरी

संभाजी पाटील भाजपात, नळेगावचा कारखाना सुरु करण्याची मागणी!

11-01-2017 : 09:42:11 Topstory, 6288 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजी पाटील यांनी आपल्या समर्थकांसह पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. लातूर शहरातील विवेकानंद संस्कार केंद्रात झालेल्या प्रवेश कार्यक्रमावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, माजी आमदार टीपी कांबळे, प्रा. मनोहर पटवारी, शैलेश लाहोटी, गुरुनाथ मगे, सुधीर धुत्तेकर, शैलेश गोजमगुंडे, प्रदीप मोरे यांची उपस्थिती होती.
चाळीस वर्षात दोन्ही निलंगेकरांना जनकल्याणाचे निर्णय घेता आले नाहीत. आम्हाला पदे नको पण किमान सन्मानाची वागणूक द्या अशी मागणी संभाजी पाटील यांनी केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा कॉंग्रेसमुक्त करण्याचे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना आगामी काळात सन्मानाची वागणूक मिळेल, जिल्ह्यात राजकीय भूकंपाला सुरुवात झाली आहे, २०१४ साली मोदी लाट आली, आता लातूर जिल्ह्यात सुनामी येणार आहे असंही संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.
या कार्यक्रमात विद्यमान जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, एसएन पाटील, ऋषिकेश बद्दे, आलकनंदा गड्डीमे, विठ्ठल उंबरगे, रामकिशन गड्डीमे, दिलीप पाटील, बाबूराव बिराजदार, सिद्धलिंग डिघोळे, शेषेराव गंभिरे, रामभाऊ कोयले, भानुदास धुमाळ, नागोराव सारंगे, दयानंद स्वामी, गंगाधर कोदळे, विनोद धुमाळे, ओमप्रकाश गलबले, विवेकानंद मंजिले, विलास करके, पंढरीनाथ साळुंके, ज्ञानोबा मलशेटे, धोंडीराम कवठाळे, हरिश्चंद्र कोल्हे, नागनाथ बेंबळगे, परमेश्वर सांगवे, त्र्यंबक सांगवे, तानाजी सोनटक्के, नरसिंग गायकवाड, बाबूभाई सगरे, महादेव आवळे, जुबेर तांबोळी, श्रीहरी सोनटक्के, सिद्राम पटणे, भाग्यश्री देवंग्रे, मन्मथ मेहकरे, संज्य हिंगमिरे, शंकर कुंभार, बाबूराव किडीले, अनंत गुंठे, तानाजी फुलारी, गुंडेराव अब्दुलपुरे, दगडू दाडगे, रामराव नाबदे, निळकंठ शिवणे, चंद्रकांत धुमाळे, पंडीत आचवले, गंगाधर येरोळे, शिवाजी उडदे, अनिल देवंग्रे, उमाकांत धुमाळे, विद्यासागर पौळकर, मन्मथ फुलारी, शरद देवंग्रे, किशोर टोंपे, समीर शेख, चांद शेख, अंगद सूर्यवंशी, रत्नदीप जाधव या कासारशिरसी, मदनसुरी, शिरुर अनंतपाळ, देवणी आणि निलंगा येथील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यात बहुतांश कॉंग्रेसशी संबंधित स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!