टॉप स्टोरी

लातूर विभागाच्या निकालात ०४ टक्क्यांनी वाढ

15-06-2017 : 05:26:36 Topstory, 2299 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर विभागाच्या दहावीच्या निकालात यंदा चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्या वर्षी ८१.५४ टक्के तर यंदा या विभागाला ८५.२२ टक्के गुण मिळाले आहेत. परंपरेप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. लातूर विभागात १३३ शाळांनी १०० टक्क्यांची कमाई केली. तर ०९ शाळांना भोपळाही फोडता आला नाही. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे २१ हजार ५०२ आहेत. ०१ लाख ०९ हजार २३१ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. पैकी ९३ हजार ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १६ हजार १३९ विद्यार्थ्यांना पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत.
यंडाच्या परिक्षेत एकूण ७४ गैरप्रकार आढळले. त्यापैकी ५६ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. या वर्षी एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला नाही अशी माहिती लातूर विभागीय मंडळाचे सचिव डॉ. गणपतराव मोरे यांनी दिली.
कबनसांगवी येथील महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनी प्रतिक्षा कांबळे हिला इंग्रजीच्या पेपरला येताना सर्पदंश झाला होता. ही बाब तिच्या मैत्रिणींनी शिक्षकांना सांगितली, तिला तातडीने लातुरच्या सरकारी दवाखान्यात तातडीने हलविण्यात आले होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर प्रतिक्षाने इंग्रजीचा पेपर दिला. रुग्णालयातून दिलेल्या या पेपरमध्ये तिला ५४ गुण मिळाले. एकूण ७३.८० टक्के गुण घेऊन ती उत्तीर्ण झाली, प्रतिक्षाचे कौतुक होत आहे. या परिक्षेत अपयश पदरी आलेल्या विद्यार्थ्यांना ११ जुलैपासून फेर परिक्षा देता येईल असेही डॉ. मोरे यांनी सांगितले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!