टॉप स्टोरी

विज्ञान शाखेसाठी शाहू-दयानंदमध्ये प्रचंड गर्दी

15-06-2017 : 05:26:23 Topstory, 2171 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): काल दहावीचा निकाल लागला. आज लातुरच्या शाहू, दयानंद आणि बसवेश्वर महाविद्यालयात प्रवेश नोंदणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी प्रचंड गर्दी केली. पॅटर्नमुळे प्रसिद्ध असलेल्या शाहू आणि दयानंद महाविद्यालयातील विज्ञान शाखेसाठी पालक-विद्यार्थी गर्दी करीत आहेत. या दोन्ही महाविद्यालयात अकरावीसाठी उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा अधिक अर्ज विकले गेले. विज्ञान खालोखाल वाणिज्य शाखेला पसंती मिळत आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयात विज्ञान शाखेत ११ वीच्या १०८० जागा आहेत. त्यापोटी ११३५ जणांनी नोंदणी केली आहे. प्रत्यक्ष नोंदणीसोबत ऑनलाईन नोंदणीही केली जात आहे. शाहूतच अकरावी वाणिज्यच्या ४८० जागा आहेत. २१२ जणांनी यासाठी नोंदणी केली. कला शाखेत ३६० जागा असून ४३ अर्जांची विक्री झाली आहे. शाहूची पहिली यादी २४ जुनला, दुसरी २९ जुनला तर तिसरी यादी ०१ जुलै रोजी जाहीर होणार आहे. ०५ जुलै रोजी विद्यार्थी पालकांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. १० जुलैपासून विज्ञान शाखेचे नियमित वर्ग सुरु होणार आहेत अशी माहिती राजर्षी शाहू कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाच्या उप प्राचार्या स्मिता दुरुगकर यांनी दिली.
दयानंद विज्ञानकडे अधिक ओढा
शाहू महाविद्यालयापेक्षा अधिक गर्दी दयानंद महाविद्यालयात दिसून आली. या महाविद्यालयात ११ वी विज्ञानसाठी ११४० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २६०० अर्ज विकले गेले आहेत. पहिली यादी २४ जून तर दुसरी यादी २८ जुनला निश्चित केली जाणार आहे. वाणिज्य शाखेच्या ८४० जागा असून ६८५ जणांनी प्रवेश नोंदणी अर्ज नेले आहेत. तर कला शाखेत ४८० जागा असून १०० जणांनी प्रवेश नोंदणी अर्ज नेले आहेत. दयानंद विज्ञानने अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ०३ जुलै रोजी पालक मेळावा आयोजित केला असून ०७ जुलैपासून अध्यापनाला सुरुवात होणार आहे असे प्रशासकीय अधिकारी प्रा. दासराव सूर्यवंशी यांनी सांगितले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!