टॉप स्टोरी

‘सेतू’च्या सर्व सुट्या ३१ ऑगस्टपर्यंत रद्द

19-06-2017 : 03:20:11 Topstory, 1919 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): सध्या सगळीकडे शाळा-महाविद्यालयांतील प्रवेशाची लगबग सुरु आहे. अनेक ठिकाणी विशिष्ट काळातच वेगवेगळी प्रमाणपत्रे दाखल करण्याची मुद दिली जाते. या काळात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व सुटीच्या आणि शनिवार-रविवारीही लातूर तहसील कार्यालयातील सेतू विभाग सुरु ठेवण्यात येत आहे. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत ही सेवा दिली जाणार आहे. प्रमाणपत्रांशी निगडीत सर्व कर्मचारी या दिवशी उपस्थित असतील. नव्या सेतू कार्यालयात १८ खिडक्या आहेत. त्यापैकी १३ सुरु आहेत. गरज पडल्यास बाकी पाचही सुरु करणार आहोत अशी माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी आजलातूर-नेटवाणीशी बोलताना दिली.
सेतुतील कामांसाठी तलाठी कार्यालयाचीही आवश्यकता असते. सुटीच्या दिवशी तलाठी कार्यालयही सुरु राहील. सुटीच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत कामकाज चालणार आहे. शेक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेअर अशा अनेक प्रमाणपत्रांची गरज पडते. यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी सेतू विभागात गर्दी केली आहे. या सोबतच लातूर तहसील कार्यालयांतर्गत चालणारी ४२ महा इ सेवा केंद्रेही सुरु राहणार आहेत.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!