टॉप स्टोरी

लातूर-मुंबई रेल्वेसाठी शैक्षणिक बंद, पोलिसांचा हस्तक्षेप

03-08-2017 : 08:50:16 Topstory, 6267 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर-मुंबई रेल्वेचे बीदरपर्यंत झालेले विस्तारीकरण रद्द करावे, लातूर-मुंबई एक्स्प्रेस पूर्ववत सुरु करावी या मागणीसाठी आज शैक्षणिक बंद पाळण्यात आला. अनेक शाळा, महाविद्यालये सकाळपासून उघडलीच नाहीत तर चालू असलेल्या शाळा आणि महाविद्यालयांना आपली भूमिका सांगून आंदोलकांनी ती बंद करायला लावली. राजस्थान, बंकटलाल या शाळा भरल्याच नाहीत तर ज्ञानेश्वर, ग्यानबा मोरे, जिजामाता अशा अनेक शाळा बंद करण्यात आल्या. अ‍ॅड. प्रदीप गंगणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू होते. रेल्वे बचाव कृती समिती युवक आघाडीचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने बंदचे आवाहन करीत असताना शिवाजीनगर पोलिसांनी परिमल शाळेजवळ हस्तक्षेप केला. बंद करण्यापासून पोलिसांनी रोखले. अ‍ॅड. प्रदीप गंगणे, अजय कलशेट्टी, रणधीर सुरवसे, कुणाल वागज यांनी आपली भूमिका समजाऊन सांगितली. आम्ही लोकशाही मार्गाने बंदचे आवाहन करीत आहोत, कसलाही गोंधळ होणार नाही, कायद्याच्या विरोधात वागणार नाही असे पोलिसांना वारंवार समजाऊन सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांना दयानंद महाविद्यालयाकडे जाण्याची परवानगी दिली.
लातूर-मुंबई रेल्वेबाबत लातुरकरांची फसवणूक करण्यात आली याचा निषेध कार्यकर्त्यांनी केला. लातुरची रेल्वे परत न मिळाल्यास पुढचं आंदोलन मात्र गनिमी काव्यानं केलं जाईल. खासदार आंदोलनात सहभागी होईन असं म्हणाले होते, त्यांची प्रतिक्षा करीत आहोत असं अ‍ॅड. प्रदीप गंगणे यांनी सांगितलं.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!