टॉप स्टोरी

उदगीरसाठी विस्तारीकरणाला हो म्हणालो: खासदार

07-08-2017 : 06:44:57 Topstory, 6289 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर-एक्स्प्रेसच्या बीदरपर्यंतच्या विस्तारीकरणाला खासदारच जबाबदार आहेत असं वारंवार स्पष्ट करुनही खासदार ते नाकारतात. इतकंच नव्हे तर त्यांनी सोशल मिडियावर गवारे, नरहरे आणि जगताप यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचीही भाषा वापरली होती. रेल्वेच्या विस्तारीकरणाला मी जबाबदार असेन तर पुरावे द्या असं ते म्हणाले होते. येथे एक पुरावा देत आहोत. २६ एप्रिल २०१७ रोजी खासदार एका कार्यक्रमानिमित्त लातुरच्या रेल्वेस्थानकावर स्थानकावर आले होते. त्यावेळी आजलातुरने त्यांची या विषयावर मुलाखत घेतली. त्यात ते म्हणतात, रेल्वेच्या स्थायी समितीचे सदस्य भगवंत खुब्बा यांनी रेल्वेमंत्र्यांना लातूर एक्स्प्रेसबद्दल सांगितले. ही गाडी दिवसभर लातूर स्थानकावर थांबून असते, इंजिन चालूच राहतं म्हणून बिदरपर्यंत नेण्याची विनंती केली. या विनंतीला मंजुरी मिळाल्यानंतर संसदेत रेल्वेमंत्र्यांनी आपणास या निर्णयाची माहिती दिली. मी त्याला संमती दिली कारण यामुळे माझ्या लोकसभा मतदारसंघात उदगीर हा मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ, चाकूर आदी भागातील नागरिकांची मुंबईला जाण्याची सोय होईल म्हणून हो म्हणालो असं खासदार सांगतात. विस्तारीकरणामुळे लातुरचे नाव राहिलंच पण बसायला जागा मिळणार नाही याची जाणीव करुन दिली असता, लातुरची बुकींगची ६३३ जागांची क्षमता आहे, त्यातली एकही सीट कमी होणार नाही. कुणाचीही अडचण होणार नाही, मी इथला खासदार आहे कुणालाही त्रास होऊ देणार नाही असे खासदारांनी विश्वासपूर्वक सांगितले होते. ऐका, पहा हा व्हिडीओ.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!