टॉप स्टोरी

व्यंकय्या नायडू भाजपा आघाडीचे नवे उप राष्ट्रपती, गांधी पराभूत

05-08-2017 : 08:30:46 Topstory, 4489 Views 0 Comments

नवी दिल्ली: उप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपा आघाडीचे व्यंकय्या नायडू विजयी झाले. त्यांना ५१६ मते पडली तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांना २४४ मते मिळाली. ७८५ पैकी ७७७१ जणांनी मतदान केले, याची टक्केवारी ९८.२१ इतकी होते. ११ मते अवैध ठरली आहेत. ०१ जुलै १९४९ रोजी जन्मलेल्या नायडू यांचे नाव ‘जय आंध्र’ आंदोलनामुळे पुढे आले होते. आणीबाणीत त्यांना कारावासही झाला होता. जयप्रकाश नारायण यांच्या जनता पक्षातही त्यांनी काम केले आहे.
या निवडणुकीत एनडीएकडे ४२५ मते होती. शिवाय त्यांना अण्णाद्रमुक, तेलंगणा राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेस आदी पक्षांनीही मदत केल्याने त्यांनी पाचशेचा टप्पा गाठला. विजयासाठी नायडू यांना ३९६ मतांची गरज होती. मिळालेली मते पाहता नायडूंचा ‘दणदणीत’ विजय झाला असं राजकीय निरीक्षक सांगतात.
कॉंग्रेस आघाडीचे गोपाळकृष्ण महात्मा गांधी यांचे नातू आहेत, त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. ११ ऑगस्ट रोजी नायडू यांचा उप राष्ट्रपती म्हणून शपथविधी होईल. ते देशाचे १५ वे उप राष्ट्रपती असतील. भाजपाशी हातमिळवणी करुनही नितीशकुमार गांधी यांच्या पाठीशी राहिले हे विशेष.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!