टॉप स्टोरी

गोरक्षकांवर कसायांचा हल्ला, आठ जखमी, दोघांना अटक

07-08-2017 : 06:44:35 Topstory, 6472 Views 0 Comments

अहमदनगर: कत्तलखान्याकडे जाणार्‍या गोवंशातील बैल आणि गायी पोलिसांच्या हवाली करणार्‍यांवर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिस ठाण्यासमोरच कसायांनी हल्ला केला यात आठ गोरक्षक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात वाहीद शेख अणि राजू फत्रुभाई शेख यांना अटक केली आहे. त्यांच्यावर जिवे मारण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. जखमी झालेले गो रक्षक पुण्याचे आहेत.
श्रीगोंद्याजवळील काष्टी गावात दर शनिवारी जनावरांचा बाजार भरतो. या बाजारातून नेहमी गोवंश कत्तलीसाठी नेला जातो. याची माहिती पुण्यातील प्राणी बचाव समितीला मिळाली होती. या शिनिवारीही काही बैल आणि गायी या बाजारातून कत्तलखान्याकडे जाणार असल्याचे त्यांना समजले होते. माहिती मिळताच समितीचे अकराजण काष्टी गावात जमले. एक टेंपो जनावरे भरुन निघाला. त्याची माहिती पोलिसांना दिली, मदत मागितली. ही गाडी पकडून पोलिसांच्या हवाली केली. यातील १० बैल आणि दोन गायी गोशाळेत पाठवण्यात आल्या. यानंतर रितसर गुन्हा दाखल करुन कार्यकर्ते बाहेर पडत असताना जमलेल्या कसायांनी कार्यकर्त्यांचे फोटो काढून घेतले. ४० ते ५० जणांनी मिळून हल्ला चढवला. यात आठजण जखमी झाले अशी माहिती गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी दिली. नंतर या जखमींना श्रीगोंद्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपेंद्र बलकवडे, प्रतिक गायकवाड़,निखिल जरांदे, केतन बासुदकर, तुषार कदम, नितिन देशमुख, सचिन जवळके, मंगेश नढे अशी जखमींची नावे आहेत. हल्लेखोरांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!