टॉप स्टोरी

रेशन मिळत नाही, रघुनाथ बनसोडे चढून बसले झाडावर!

09-08-2017 : 03:19:56 Topstory, 7879 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): कधी पाण्याच्या टाकीवर, कधी सरणावर तर कधी महापालिकेच्या इमारतीवर चढून बसणारे रघुनाथ बनसोडे आज झाडावर चढून बसले!
चाकूर तालुक्यातील कडमुळी या गावातील रेशन दुकानदाराच्या घराचे, दुकानाचे नुकसान करुन त्यांच्या दुकानातील माल ग्रामपंचायतीत नेऊन ठेवला. यामुळे दुकानदारावर तर अन्याय झालाच झाला पण दुकान बंद राहिल्याने गावातील रहिवाशांना रेशनही मिळाले नाही. याचा निषेध करीत, दुकानदाराला न्याय द्यावा, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ बनसोडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील झाडावर चढून बसले, एक नव्हे दोन नव्हे तबल चार तास! या काळात त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकार्‍यांनी-पोलिसांनी विनवणी केली. पण त्यांनी ऐकलं नाही. लेखी आश्वासन मिळण्याची खात्री पटताच ते झाडावरुन उतरले.
या संदर्भात बनसोडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना एक निवेदन दिले आहे. कडमुळी गावात त्र्यंबक माधवराव इंगळे अनेक वर्षांपासून रेशन दुकान चालवतात. आजवर त्यांच्या विरोधात कसलीही तक्रार नव्हती. जातीय द्वेष भावनेतून गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठ्याने संगनमत करुन इंगळे यांच्या घराची नासधूस केली. दुकानाची तोडफोड केली. आणि दुकानातील स्वस्त धान्य बेकायदेशीररित्या ग्रामपंचायतीत नेऊन ठेवले. यामुळे गावातील गरजू वेठीस धरले गेले. इंगळे यांना न्याय मिळावा यासाठी चाकूर पंचायत समितीसमोर आंदोलन केले, आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेतले. अद्यापही काहीच न झाल्याने विभागीय आयुक्तांनाही ही बाब कळवण्यात आली. कडमुळीचे सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठ्यावर कारवई करावी, इंगळे यांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!