टॉप स्टोरी

खाजगी ट्यूशनचालक, तूर प्रकरणी कारवाई- जिल्हाधिकारी

09-08-2017 : 03:19:31 Topstory, 8648 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर शहरात खाजगी शिकवण्यांचे मोठे स्तोम आहे. या शिकवण्या चालवणारे पार्किंगची सोय करीत नाहीत, काही ठिकाणी अनधिकृत इमारतींचाही प्रश्न आहे. या शिकवणीचालकांनी विद्यार्थ्यांसाठी पार्किंगची सोय न केल्यास कारवाई करु असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जिल्हाधिकारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
शहरात जवळपास १०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरु आहे. यामुळे रहदारी नियंत्रणात राहील शिवाय चुकीच्या गोष्टींवर आळा बसेल. या कॅमेर्‍यांचे उदघाटन स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते केले जाईल अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. सध्या पिकांची स्थिती नाजूक आहे. पाऊस न पडल्यास ती गंभीर होईल. पालकमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार निम्न तेरणा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. त्या भागातील पिके चांगली आहेत असे ते म्हणाले. लातूर शहरात मनपाचे गाळे तारण ठेऊन अनेकांनी कर्ज उचलले आहे याबाबतचा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. दोघांनी त्यासाठी परवानगी घेतली होती. पुढच्या सर्वसाधारण सभेत याबाबत निश्चित धोरण आखले जाईल. तारण शुल्क आकारता येईल का याचाही विचार करु. शहरातील कोंडवाडा रिकामा आहे आणि जनावरे रस्त्यावर फिरतात हे लक्षात आणून दिले असता, जनावरांच्या मालकांनी आपापली जनावरे ताब्यात ठेवावीत अन्यथा मनपा कारवाई करेल असे ते म्हणाले. तूर खरेदीत लातुरात गोंधळ झाल्याची चर्चा आहे. शेतकर्‍यांकडून कमी भावाने तूर खरेदी करुन व्यापार्‍यांनी विकली याबाबत प्रश्न विचारला असता माहिती मिळाल्यावर नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करु असं जिल्हाधिकारी म्हणाले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!