टॉप स्टोरी

हातगाडेवाल्यांचा मोर्चा, यमाचा सहभाग!

12-08-2017 : 06:13:00 Topstory, 7713 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे हजारोजण बेरोजगार झाले आहेत. या सर्वांनी आज मनपाव मोर्चा काढला. पोलिस पाठीवर मारतात, महानगरपालिका पोटावर मारते जगायचं कसं असा प्रश्न मोर्चेकर्‍यांनी केला. या मोर्चात शहरातील गंजगोलाई, शाहू चौक, विवेकानंद चौक, शिवाजी चौक, राजीव गांधी चौक, नंदी स्टॉप, पाण्याची टाकी, रेणापूर नाका आदी भागातील विस्थापित व्यावसायिकांचा समावेश होता. मोर्चाच्या अग्रभागी यमाची वेशभूषा धारण केलेल्या युवकाच्या हाती दोर्‍या होत्या. या दोर्‍या मागून येणार्‍या छोट्या व्यावसायिकांच्या हाताला बांधण्यात आल्या होत्या. हे व्यावसायिक अतिक्रमण विरोधी मोहीमेमुळे मेल्यागत आहेत. यमराज त्यांना महानगरपालिकारुपी नरकात घेऊन जात आहेत असे मोर्चाचे संयोजक स्वाभिमानी मुस्लीम विकास परिषदेचे अध्यक्ष मोहसीन खान यांनी सांगितले.
शहरातील हातगाडे व्यावसायिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परवाने द्यावेत, फेरीवाला धोरण राबवावे, विविध चौकात छोट्या व्यावसायिकांना झोन करुन द्यावेत, फुटपाथवर व्यवसाय करणार्‍यांना जागा उपलब्ध करुन द्यावे, गंजगोलाई भागातील भाजीपाला विक्रेते आणि इतर व्यावसायिकांना पॉवर हाऊस येथे जागा द्यावी, १६२ टपरीधारकांना तात्काळ पर्यायी जागा द्यावी अशा मागण्या मोर्चेकर्‍यांनी केल्या. मोर्चात महिलांचाही सहभाग होता. यावेळी अफजल कुरेशी, गौस गोलंदाज, आसीफ अब्दुल सत्तार, हमीदखान, रईस टाके, सत्तार शेख, इरफान शेख, बबलू शेख, अन्वर शेख, अन्वर बागवान, बबलू बागवान, अजहर बागवान, आसीफ शेख, सादीक शेख, मुख्तार बागवान यांच्यासह अनेक व्यावसायिक सहभागी झाले होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!