टॉप स्टोरी

अमृत अडचणीत: जीएसटी कंत्राटदारानेच भरावी अन्यथा...

07-10-2017 : 10:58:20 Topstory, 3253 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): अमृत मिळवणे जितके कठीण तितकेच कठीण अमृत योजनेतून पाणी मिळवणेही असेल असे दिसतेय. मुळात गुत्तेदाराचे काम संथगतीने सुरु आहे. वेळेत का पूर्ण होणार नाही हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे. अनेकदा तंबी देऊनही गुत्तेदार कुणालाच दाद देत नाही. खड्डे खोदले जातात पण तिथं धोक्याचं निशाण किंवा सूचना देणारे फलकही नसतात. त्यामुळे वारंवार अपघातही होतात. या संकटांच्या यादीत आणखी नव्या संकटाची भर पडली आहे. या योजनेसाठी काही यंत्रे खरेदी करावी लागणार आहेत. त्याचा समावेश टेंडरमध्ये होता. हे टेंडर जीएसटी लागू होण्यापूर्वी मंजूर झाले आहे आणि आता यंत्रे खरेदी करताना जीएसटी भरावी लागणार आहे. त्याची रक्कम कोटीच्या घरात जात अहे. ती भरायची कुणी असा वाद निर्माण झाला आहे. आज या मुद्द्यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. गुत्तेदार जीएसटी भरणार असेल तर त्याला हे खरेदीचे काम करु द्यायचे अन्यथा अमृतचा या खरेदीच्या भागाचे टेंडर नव्याने काढायचे असा निर्णय घेण्यात आला. धरणात पाणी असूनही लोकांना वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नाही अशी तक्रार शैलेश स्वामी यांनी केली. अमृतच्या टेंडरमधील अटी-शर्ती, सरकारचे नियम याचा आढावा शैलेश गोजमगुंडे यांनी घेतला. गुत्तेदार जीएसटी भरणार असेल तर त्याला खरेदीचे काम करु द्यायचे असा तत्वत: निर्णय घेण्यात आला. यावेळी संगीत रंदाळे, विक्रांत गोजमगुंडे, अहमदखां पठाण, दीपाताई गिते, राजा मनियार, सचिन बंडापल्ले, शीतल मालू, कल्लाप्पा बामणकर, डॉ. महेश पाटील, डॉ. सुहास गोरे, युनूस मोमीन, दिलीप चिद्रे, विजय चोळखणे, अशोक सुतार उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!