टॉप स्टोरी

महालक्ष्मीचा मंडप अजून तसाच, किती दिवस लाड?

07-10-2017 : 10:57:56 Topstory, 3803 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवाच्या नावावर आपल्याकडे बहुतेकांना चांगल्याच सवलती आणि सुविधा मिळतात. शिवाजी चौकातील राजा गणपती ते लातुरची महालक्ष्मी या उपक्रमाला लातूर महापलिकेनं चांगलीच सवलत दिली आहे. अशा कार्यक्रमांसाठी महापालिका जागेचे भाडेही आकारत नाही. पण ३१ नियमांची तीन पानी सूची मात्र दिली जाते. त्यातले नियम कुणालाच पाळणे शक्य होत नाही. दरवर्षी शिवाजी चौकातील पार्किंगसाठी असलेल्या जागेत राजा गणपती विराजमान होतात. त्यांचा मंडप मग नवरात्रापर्यंत तसाच राहतो. नवरात्र संपली, दसरा झाला तरी ते हटवलं जात नाही. कार्यकर्त्यांच्या सोयीने, सवडीने, निवांतपणे तो काढला जातो.
राजा गणपतीसाठी २५ ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर या काळासाठी मनपाने जागेची परवानगी दिली होती. त्याला पोलिसांनीही नाहरकत दिली होती. पाच सप्टेंबर ते घटस्थापनेपर्यंत म्हणजे २९ सप्टेंबरपर्यंत हा मंडप तसाच राहिला. २९ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत इथे लातुरच्या महालक्ष्मीचा मुक्काम होता. नवरात्रासाठी मनपाने ही जागा वापरण्याची परवानगी दिली. पण त्यासोबत पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र जोडण्यास मात्र कार्यकर्ते विसरले. या मंडपाने ही जागा तबल ४३ दिवस व्यापून ठेवली होती. आज आजलातूरचा कॅमेरा फिरला, मनपात आमच्या प्रतिनिधीने चौकशी केली आणि सुत्रे हलली आता कुठे आस्तेकदम मंडप उतरवणं सुरु झालं आहे.
धार्मिक कार्यक्रमांसाठी मनपा जागेचे भाडे आकारत नाही. पण तीन पानांची नियमावली अतिशय कडक आहे. पर्यावरणपूरक रंग वापरावेत, प्लास्टीकचा वापर टाळावा, थर्माकोल वापरु नये, गुलालाऐवजी फुलांचा वापर करावा, जागा ताब्यात घेण्यापूर्वी नकाशा द्यावा, टेलीफोन आणि विजेच्या तारांचे नुकसान करु नये, डीपीपासून सहा फूट अंतरापुढे मंडप असावा, अग्नीशामकदलाचे नाहाकत प्रमाणपत द्यावे, अग्नीशमनाची व्यवस्था करावी, इतरांच्या धार्मिक भावना दुखवू नयेत, ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, कार्यक्रम संपल्यावर जागा पूर्ववत स्वच्छ करुन द्यावी, मंडपासाठी रस्त्यावर खड्डे पाडू नयेत. ध्वनी प्रदूषण करु नये, मंडपात अन्न शिजवू नये, स्फोटक पदार्थ ठेऊ नयेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनधिकृत वीज कनेक्षन घेऊ नये! अशी अतिशय कठोर नियमावली या मंडळांना दिली जाते. यातील किती गोष्टी कितीजणांनी पाळल्या त्या तुम्ही पाहिल्याच असतील!

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!