टॉप स्टोरी

मी लातूरचा जिल्हाधिकारी, हे माझे भाग्य- जी. श्रीकांत

11-10-2017 : 03:59:17 Topstory, 5156 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): मला लातूरचा जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे. आजलातूर अणि नेटवाणीने दिवाळीच्या निमित्ताने ‘माझं लातूर, माझं व्हिजन’ या उपक्रमाला सुरुवात केली आहे. याची सुरुवात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यापासून करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझी लातुरला बदली झाली. पावसाची प्रतिक्षा करण्याचा हा महिना होता. लातुरचा पाणी प्रश्न जगजाहीर होता. लातुरचा पाणी प्रश्न सोडवणे हे माझ्यासाठी आव्हान होते. योगायोगाने मी आलो त्या दिवशी पाऊस झाला. मला लातुरचा जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. पाऊस चांगला झाला आहे. जिल्ह्यात पिकांची स्थितीही चांगली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही पाण्यासाठी काम करणे आवश्यक आहे, त्यात सातत्यही ठेवणे गरजेचे आहे. या जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या प्राधान्याने सोडवणे हा माझा उद्देश आहे असंही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!