टॉप स्टोरी

मालमत्ता कर वाढलाच नाही- जी. श्रीकांत

12-10-2017 : 09:01:31 Topstory, 5114 Views 0 Comments

लोकप्रतिनिधी, जनरल बॉडीला विश्वासात घेऊन लातुरचा सर्वांगीण विकास करायचाय...
महानगरपालिकेकडून लावण्यात आलेल्या मालमत्ता कराचा विषय सध्या बराच गरम आहे. बहुतेकांना हा कर अन्याय्य वाटतो. याबाबत जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काही लोकांना कर वाढल्यासारख्या वाटतो, कुणाला दहा टक्के, कुणाला वीस टक्के वाढ झाल्यासारखी वाटते. पण असं नाही. कर एक रुपयानेही वाढलेला नाही. पूर्वी होता तेवढाच आहे. पूर्वी जागेचे चुकीचे मोजमाप झाले होते, त्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. काही रिकाम्या जागा होत्या, त्यांना रिकाम्या जागेचा कर लागायचा पण आता त्या ठिकाणी बांधकाम झाले आहे. काही ठिकाणी निवासी बांधकाम करण्यात आले होते पण आता अनेक ठिकाणी निवासी इमारतींचा व्यावसायिक वापर केला जातो. याचा विचार करुन योग्य पद्धतीने कर आकारणी केली जात आहे. अनेकांना चुकीने अधिक कर लावण्यात आला होता, त्यांचा कर कमीही करण्यात आला आहे. ज्या बील कलेक्टरनी चुकीचे कर लावले होते त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक घराचे, मालमत्तेचे नव्याने मोजमाप घेऊन, त्याचे फोटो घेऊन संबंधितांची त्यावर सहीसुद्धा घेण्यात आली आहे अशी माहिती श्रीकांत यांनी दिली.
शहरात नाना नानी पार्क वगळता एकही बाग नाही, खेळायला जागा नाही, मनपाला मला आर्थिक स्वायत्त करायचे आहे. लातूर शहरातील जनता संवेदनशील आणि संयमी आहे. शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ते बुजवायचे आहेत, स्मशानभूमीचा विकास करायचा आहे. तुम्हाला तुमच्या हक्काच्या गोष्टी मिळवून देण्यासाठी मला काम करायचे आहे. जनरल बॉडी, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सर्वांगीण विकास करायचा आहे. लोक म्हणतात कर घ्या पण सुविधा द्या तेच मला करायचे आहे. चुकीचा कर लागला असेल तर आक्षेप घ्या त्याचा विचार केला जाईल, दुरुस्ती केली जाईल. पण चुकीच्या गोष्टीला थारा देऊ नका असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!