टॉप स्टोरी

लवकरात लवकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल- डीन पोवार

14-10-2017 : 09:55:32 Topstory, 2763 Views 0 Comments

‘माझं लातूर-माझं व्हिजन’मध्ये भेटा अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना
लातूर (आलानेप्र): २६ सप्टेंबर रोजी लातूरने, सर्वोपचार रुग्णालयाने आणि लोभे कुटुंबियांनी इतिहास घडवला. किरण लोभेच्या अवयवांचं दान करण्यात आलं. लातुरच्या वैद्यकीय महाविद्यालयात नव्याने रुजू झालेले अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया आणि सगळे सोपस्कार पार पडले. सर्वात मोठे नागपुरचे वैद्यकीय महाविद्यालय अणि सोलापूर-कोल्हापुरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पोवार डॉ. यांनी यशस्वीरित्या बजावली आहे. आजलातूर-नेटवाणीने सुरु केलेल्या ‘माझं लातूर-माझं व्हिजन’मध्ये आज डॉ. पोवार यांनी वैद्यकीय क्षेत्रातील मानस-व्हिजन सांगितलं.
मागच्या आठ वर्षांपूर्वी लातुरला स्वतंत्र जिल्हा रुगणालय मंजूर झाले पण अद्याप त्याचे काहीच झाले नाही. हे रुग्णालय न झाल्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान होत आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यात १५० कोटींचे काम होत आहे. दुसर्‍या टप्प्यात ८० कोटींची अद्ययावत उपकरणे घेतली जातील. तिसर्‍या टप्प्यात डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी भारतीसाठी मंजुरी मिळेल. हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तीन वर्षात सुरु करण्याचा मानस आहे. लातुरचं जिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरु व्हावं यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासन आणि आम्ही प्रयत्नशील आहोत. या रुगणालयातील उपचारानंतर गरज असलेल्या रुग्णांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार करता येतील. लातुरचं वैद्यकीय महाविद्यालय अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दोन ते तीन महिन्यात आयसीयू सुरु होईल. १५ ते १६ व्हेंटीलेटर्स सुरु होतील. अवयवदानासाठी कराव्या लागणार्‍या शस्त्रक्रिया लवकर व्हाव्यात हेही व्हिजन आहे. लतूरचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय कोल्हापूर ते नागपूर दरम्यानचं एकमेव रुग्णालय असेल असेही डॉ. पोवार यांनी सांगितले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!