व्हिडिओ न्यूज

कॉंग्रेसमध्ये न्याय मिळत नाही, दिशाभूल होते- संभाजी पाटील

2017-01-11 23:01:17 Mainvideo, 60057 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): मागच्या ४० वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये इमानदारीने काम करीत आलो. पण या पक्षात न्याय मिळत नाही. कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपला जात नाही यामुळे आपण भाजपात आलो असं माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संभाजी पाटील यांनी सांगितलं. स्वामी विवेकानंद संस्कार केंद्रात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत संभाजी पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या कन्या जयश्री पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला. कॉंग्रेसमध्ये ४० वर्षे कामे केला आमचे नेते आमच्या ताकदीवर मोठे होतात पण कार्यकर्त्यांना मोठे करीत नाहीत. शिरुर अनंतपाळला तालुका करताना याच नेत्यांनी टाळाटाळ केली. पण युती सरकारने शिरुर अनंतपाळला तालुका केले. कॉंग्रेसचे पाच आमदार होऊनही हे काम झाले नाही. हा तालुका झाला तेव्हा भाजपाच्या मंचावर जाऊन आपण अभिनंदन केले असेही पाटील म्हणाले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!